मुंबई : संतूर वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे जगद्विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भारतीय अभिजात संगीतात पं. शिवकुमार शर्मा यांचे योगदान अतुलनीय होते. Santoor player Pandit Shivkumar Sharma passed away
शर्मा यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. तसेच पद्मश्री आणि पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलंय. त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले. संतूर या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे जगद्विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे निधन झाले आहे. आज १० मे रोजी त्यांचे निधन झाले आहे.
शिवकुमार शर्मा यांच्या वडिलांनी संतूर वाद्यावर सखोल संशोधन केले आणि शिवकुमार हे भारतीय शास्त्रीय वादन करणारे पहिले भारतीय व्हावेत असा निर्धार केला. संतूर वर संगीत. त्यानंतर त्यांनी वयाच्या 13 व्या वर्षापासून संतूर वाजवण्यास सुरुवात केली आणि नंतर त्यांच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले. 1955 मध्ये पहिला कार्यक्रम केला. तसेच, भारतीय अभिजात संगीतात पं. शिवकुमार शर्मा यांचे योगदानही अतुलनीय होते. त्याचबरोबर शिवकुमार शर्मा यांनी संतूर या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/537692577908476/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
शिवकुमार शर्मा यांच्या वडिलांनी संतूर वाद्यावर सखोल संशोधन केले आणि शिवकुमार हे भारतीय शास्त्रीय वादन करणारे पहिले भारतीय व्हावेत असा निर्धार केला. संतूर वर संगीत. त्यानंतर त्यांनी वयाच्या 13 व्या वर्षापासून संतूर वाजवण्यास सुरुवात केली. आणि नंतर त्यांच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले.
संतूर या काश्मीरमधील लोकवाद्याला अभिजात संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या शिवकुमार यांनी भारतीय चित्रपट संगीतातही फार मोठी कामगिरी बजावली. ‘सिलसिला’ या चित्रपटाला बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बरोबर त्यांनी दिलेले संगीत रसिकांच्या सतत आठवणीत राहणारे ठरले आहे.
‘कॉल ऑफ द व्हॅली’ ही त्यांची ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यामध्ये पं. हरिप्रसाद चौरसिया आणि गिटारवादक ब्रिजभूषण काबरा यांच्याबरोबर त्यांनी वादन केले होते. हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरची त्यांची जोडी खूप गाजली. ही जोडी ‘शीव-हरी’ या नावाने ओळखली जात असे. या जोडीने अनेक चित्रपटांना संगीतबध्द केले असून, यश चोप्रांचा ‘सिलसिला’ (१९८०) हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर या जोडीने ‘फासले’ (१९८५), ‘चांदणी’ (१९८९), ‘लम्हे’ (१९९१), ‘डर’ (१९९३) या चित्रपटांना संगीत दिले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/537854511225616/