सोलापूर : मनपा निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घ्यावी, असा निर्णय राज्य सरकारकडून घेतला आहे. आता प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. 17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने आयुक्त पी. शिवशंकर यांना बोलावले आहे, त्यानुसार आयुक्त बुधवारी मुंबईला जाणार आहेत. Summoning the Commissioner of Solapur Municipal Election Commission; Final ward formation by May 17
दरम्यान, ज्या प्रभागावर हरकती आल्या आहेत, त्यातील एक-दोन प्रभागात बदल होण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत. मनपा निवडणूक प्रक्रियेची माहिती प्रशासनाने निवडणूक आयोग, शासनाला सादर केली. त्यामुळे मनपाकडून निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा होती. अखेर आयोगाकडून आयुक्तांना बोलावणे आले आहे. आयोगाने राज्यातील अन्य मनपासह स्थानिक स्वराज्य संस्थांकडून माहिती मागितली आहे.
मनपाने 10 मार्च 2022 पर्यंतची माहिती आधीच सादर केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय नको यासाठी, यासाठी सर्व राजकीय पक्ष एकवटले होते. मात्र निवडणुकांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला भाजपने घेरले होते. अशा परिस्थितीत ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारने नवीन विधेयकाद्वारे कायदा मंजूर केला आणि राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेतले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/538525731158494/
तसेच निवडणूक आयोगाच्या आदेशाने यापूर्वी झालेली बहुसदस्यीय प्रभाग रचना रद्द केली होती. दरम्यान सरकारच्या उपरोक्त निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने एक आदेश जारी केला होता. दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असून त्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.
प्रभागाच्या सीमा निश्चित करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना बुधवारी महापालिका आयुक्तांकडे स्वाधीन केल्या. याबाबतचे पत्र महापालिकेला मिळाले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
रचनेबाबत १०८ सूचना व हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यावर फेब्रुवारी महिन्यात सुनावणी घेण्यात आली होती. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूकही केली होती. मार्च महिन्यात प्रभाग रचनेबाबतचा अहवाल आयोगाला सादर करण्यात आला होता.
□ एक – दोन प्रभागात हद्द बदलचे संकेत
महापालिका निवडणुका त्रिसदस्यी पद्धतीनेच होणार आहेत. फेब्रुवारीमध्ये जाहीर झालेल्या प्रभाग रचनेनुसार सोलापूर महापालिकेसाठी 38 प्रभाग आहेत. 37 प्रभाग तीन सदस्यीय तर एक प्रभाग सदस्यीय आहेत. एकूण 113 जागा आहेत. दरम्यान एकूण 38 प्रभागासाठी 117 हरकती आल्या आहेत. त्यानुसार निवडणूक अधिकार्यांनी त्याची पडताळणी केली होती. एक – दोन प्रभागात हद्द बदल होतील, असे संकेत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/538422741168793/