Surajya Digital

सोलापूर : दुरुस्तीचे काम करताना दोन वीज कर्मचारी जखमी, एक गंभीर

सोलापूर : दुरुस्तीचे काम करताना दोन वीज कर्मचारी जखमी, एक गंभीर

 

सोलापूर : वीज तारांची दुरुस्ती करताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने दोघांना विजेचा जोरात शॉक लागला. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले. यातील गंभीर अवस्थेत असणाऱ्या एकाला खासगी रुग्णालयात तर दुसऱ्याला सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. Solapur: Two power workers injured, one seriously injured during repair work

शहरातील महावितरणच्या ‘क’ उपविभागामध्ये आज बुधवारी (दि.११ मे) मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीचे कामे करत असताना दोन वीज कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का बसून जखमी झाले आहेत. यातील एका वीज कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

सोलापुरात वीज यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीचे कामे बुधवारी केली जातात. रामलाल चौक शाखेअंतर्गत आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास वरिष्ठ तंत्रज्ञ शेख रब्बानी अहमद (वय अंदाजे ३७ वर्षे) व कंत्राटी कर्मचारी अझहर चाँद तांबोळी (वय अंदाजे २२ वर्षे) हे दोघे सिव्हील वीज उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ के.व्ही. रामलाल चौक फिडरवर रेल्वे स्टेशन परिसरातील एका ठिकाणी विजेच्या तारांना लागणाऱ्या फांद्या छाटण्याचे काम करत होते.

याकरिता त्यांनी महावितरणच्या शिडीगाडीची मदत घेतली होती. तरीही काम करताना अचानक लागलेल्या शॉकमुळे ते जखमी झाले आहेत. या दोन्ही कर्मचाऱ्यांना तातडीने अश्विनी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, दोघांपैकी शेख रब्बानी अहमद यांची प्रकृती गंभीर आहे.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

https://www.facebook.com/109399567404448/posts/538596554484745/

 

अपघात नेमका कशामुळे झाला, वीज पुरवठा बंद केल्याची खातरमजा या दोघांनी केली होती की नाही याची माहिती समजली नाही. विद्युत निरीक्षकाच्या अहवालानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.

या घटनेतील गंभीर असलेल्या एकाला शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले. तर दुसऱ्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट दिले होते का नाही? याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

 

□ मंद्रूप येथे सत्तूरने मारहाण, महिलेसह तिघे जखमी

– मंद्रूप (ता.दक्षिण सोलापूर) येथे डुक्कर सोडल्याच्या कारणावरून काठी आणि सत्तूरने केलेल्या मारहाणीत रामा वजीर मरीआईवाले (वय ३५) त्याची पत्नी काशीबाई आणि लक्ष्मण वजीर मरीआईवाले (वय ४०) असे तिघेजण जखमी झाले.
ही घटना काल मंगळवारी (ता.10 ) सकाळच्या सुमारास घडली. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. देवानंद मरीआईवाले, राजू मरिआईवाले यांच्यासह चार ते पाच जणांनी मारहाण केली, अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

Related Articles