सोलापूर – लग्नाचे आमिष दाखवून पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी जोडभावी पेठच्या पोलिसांनी सोमनाथ राम गुंडाराम (वय २३ रा. मड्डीवस्ती, जुना तुळजापूर नाका ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. Rape of a woman on the pretext of marriage; Atrocities on the abducted girl
ती २७ वर्षीय महिला कर्नाटक येथे राहण्यास असून सोलापुरात माहेरी येत होती. सोमनाथ गुंडाराम याने तिच्याशी ओळख वाढवून तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. आणि २०१९ पासून ते आजतागायत तिच्यावर रुपाभवानी मंदिर बागेजवळ आणि संजीवनी हॉटेल (दहिटणे रोड) या ठिकाणी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. अशा आशयाची फिर्याद त्या महिलेने नुकतीच जोडभावीपेठ पोलिसात दाखल केली. पुढील तपास महिला फौजदार व्हट्टे या करीत आहेत.
□ पळवून नेलेल्या मुलीवर अत्याचार केल्याचे निष्पन्न; दोघांना ५ दिवसाची कोठडी
सोलापूर – एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सदर बाजारच्या पोलिसांनी दोघांविरुद्ध बलात्कार, पोक्सो आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक केली. त्यांना ५ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायालयाने मंगळवारी (ता.10) दिला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/538603497817384/
सोहेल रियाज शेख (वय २२ रा. शास्त्रीनगर,भाजी मार्केट जवळ) आणि ऋषिकेश मेघराज हजारे (वय २० रा.न्यूपाच्छा पेठ, पाथरूड चौक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना १४ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. सदर बाजार परिसरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण २७ एप्रिल रोजी करण्यात आले होते.
यासंदर्भात मुलीच्या पालकांनी सदर बाजार पोलिसात तक्रार दाखल केली होती.पोलिसांनी दोन्ही आरोपींना नुकतीच अटक केली. पिडीत मुलीवर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे पोलिसांनी आरोपीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यातील कलमात वाढ करून सोमवारी अटक करून पोलीस कोठडी घेतली. पूढीलतपास सहाय्यक पोलिस आयुक्त करीत आहेत.
■ मंद्रूप येथे सत्तूरने मारहाण महिलेसह तिघे जखमी
– मंद्रूप (ता.दक्षिण सोलापूर) येथे डुक्कर सोडल्याच्या कारणावरून काठी आणि सत्तूरने केलेल्या मारहाणीत रामा वजीर मरीआईवाले (वय ३५) त्याची पत्नी काशीबाई आणि लक्ष्मण वजीर मरीआईवाले (वय ४०) असे तिघेजण जखमी झाले. ही घटना मंगळवारी (ता. 10) सकाळच्या सुमारास घडली.त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. देवानंद मरीआईवाले, राजू मरिआईवाले यांच्यासह चार ते पाच जणांनी मारहाण केली. अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/538596554484745/