बार्शी : रेल्वेतून चोरलेले डिझेल विकून उरलेले जमिनीवर ओतून उस्मानाबाद येथे टँकर धुण्यासाठी घेवून जात असताना वैराग – उस्मानाबाद रोडवर रातंजन शिवारात संशयास्पदरीत्या आढळलेल्या टँकर चालकाच्या चौकशीत डिझेल चोरीचा गुन्हा उघडकीस आला. Diesel theft from train in Vairag, cleaner killed after hitting Tempo ST
वैराग पोलीसांनी चालकास ताब्यात घेऊन या प्रकरणाची फाईल रेल्वे प्रशासनाकडे वर्ग केल्याची माहिती वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी दिली. सदर घटना आठ मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वैराग – उस्मानाबाद रोडवर रातंजन शिवारात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, ८ मे रोजी वैराग पोलिसांचे पथक वैराग – उस्मानाबाद रोडवर पेट्रोलिंग करीत असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रांतजन फॉरेस्ट परिसरात एक टॅकर संशयास्पदरीत्या उभा होता. टँकरजवळ जाऊन पाहणी केली असता टँकर चालक किरण मारुती ननवरे (रा . बिबिदारफळ ता . उत्तर सोलापूर) हा टँकरमधील डिझेल जमीवर ओतताना आढळला. त्याचेकडे चौकशी केली असता सुरुवातीस त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.
नंतर त्याने सांगितले की, ता . 7 मे रोजी रात्री मोहोळ येथे आष्टी रोडवर रेल्वे डिझेल टँकर घेवून जाताना रेल्वे कॉसींगसाठी थांबली होती. रेल्वे चढावर आणि टँकर खड्ड्यात असल्याने पाकणी येथील काही लोक रेल्वेच्या टँकरवर चढले आणि झाकण तोडून पाईप टाकून डिझेल टँकरमध्ये घेतले. त्यातील बरेचसे डिझेल मालकाने विकले असून उरलेले डिझेल जमिनीवर ओतून उस्मानाबाद येथे टँकर धुण्यासाठी घेवून चाललो होतो. सदर टँकरचा मालक देखील बिबिदारफळ येथील असल्याचे चालकाने सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/538596554484745/
पोलीसांनी टँकरची पाहणी केली असता टॅकरवर इंडीयन ऑईल अथवा हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा लोगो नव्हता. चालकाजवळ टँकरची कागदपत्रे , डिझेल खरेदीची कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यामुळे टँकर पोलिस ठाण्यात आणला.
सदर बाब पुरवठा विभागास तसेच पेट्रोलीयम कंपन्या यांच्याशी पत्रव्यवहार करून माहिती घेवून चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी सांगितले.
□ ब्रेक फेल झालेला टेम्पो एसटीला धडकून क्लीनर ठार
सोलापूर – ब्रेक फेल झालेला आयशर टेम्पो समोरून येणाऱ्या एसटीवर धडकल्याने टेम्पोचा क्लिनर गंभीर जखमी होऊन मरण पावला. हा अपघात कन्हेरवाडी ते येरमाळा (जि.उस्मानाबाद) येथील पानगाव जवळ मंगळवारी (ता. 10) दुपारच्या सुमारास घडला.
प्रदीप आशोक घोंगडे (वय २१ रा. कन्हेरवाडी जि.उस्मानाबाद) असे मयत झालेल्या क्लिनरचे नाव आहे. मंगळवारी दुपारी तो आयशर टेम्पोतून येरमाळा येथे जात होता. परतापुर ते पानगाव रस्त्यावर अचानक टेम्पोचे ब्रेक निकामी झाले. आणि टेम्पो समोरील एमएच २०- बीएल -२५९० या एसटीला धडकला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उस्मानाबाद येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला. या अपघाताची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे .
■ खानापूर येथे भावावर तलवारीने हल्ला
खानापूर (ता.अक्कलकोट) येथे माझ्या घरात का आला असे म्हणून तलवारीने तोंडावर मारल्याने सोमनाथ गणपती शिपाई (वय ५५) हा जखमी झाला. ही घटना सोमवारी (ता. 9) रात्रीच्या सुमारास घडली. त्याला तडवळ येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा भाऊ चिदानंद शिपाई याने मारहाण केली, अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/538603497817384/