सोलापूर : आईने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील आलेगाव शिवारात घडली. या घटनेची नोंद वळसंग पोलिस ठाण्यात रात्री उशिरा झाली आहे. Solapur: Two young children died with mother in Tilahhal
दक्षिण सोलापूर तालुक्यातील आलेगाव येथे एका विवाहितेसह तिच्या दोन मुलांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार आत्महत्येचा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोनाली सिद्राम चोपडे (वय ३२ रा. तिल्हेहाळ ) आणि तिची मुले संतोष (वय ८) व संदीप (वय ५) अशी मृत मायलेकांची नावे आहेत.
सोनाली चोपडे ही मूळची तिल्हेहाळ (ता. दक्षिण सोलापूर) या गावची राहणारी होती. आलेगावात दयानंद वसंत शिंदे यांच्या शेतातील विहिरीत सदर महिलेसह दोन्ही मुले पाण्यात बुडाल्याचं समोर आलं. ग्रामस्थांना हे समजलं असता त्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू करण्यात आले. त्यांना बाहेर काढले असता तिघेही मृतावस्थेत आढळून आले. वळसंग पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
चोपडे दांपत्य हे मूळ तिल्लेहाळ येथे राहणारे असून त्यांची थोडीफार शेती आलेगाव येथे आहे. तिचा पती सिद्राम चोपडे हा शेती आणि मजुरी करतो तर सोनाली ही घरकाम तसेच शेळ्या राखण्याचे काम करीत होती. असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र तिने मुलासहित आत्महत्या का केली? हे मात्र समजले नाही. या घटनेची नोंद वळसंग पोलीसात झाली असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुरवसे हे करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/538675881143479/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ कामगारांच्या बेपवाईचा फटका :
पिण्याचे पाणी म्हणून नववधूला दिले केमिकल प्यायला
सोलापूर : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. यामुळे लग्नाचे कपडे खरेदीसाठी अनेक दुकानांमधून गर्दी होत आहे. अशाच येथील एका कापड दुकानात बस्ता खरेदीसाठी आलेल्या नववधूला पिण्याचे पाणी म्हणून चक्क फिनेलयुक्त पाणी दिल्याने तिला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कडक उन्हाळ्यामुळे सध्या सर्वांचीच लाहीलाही होत आहे. अशात वारंवार तहान लागत आहे. त्यामुळे मिळेल तेथे पाणी पिले जात आहे. मात्र, असे पाणी पिणे एका तरुणीच्या जीवावर बेतल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. पंढरपूर शहरातील एका कापड दुकानात गोपाळपूरमधील एक कुटुंब नववधूसह लग्नाचा बस्ता खरेदीसाठी गेले होते. खरेदी सुरू असताना नववधू तरुणीला तहान लागली. त्यावेळी तिने तेथील कामगारांना पाणी मागितले.
गडबडीत कामगाराने पाण्याच्या बाटलीत फरशी पुसण्यासाठी ठेवलेले लायझोल केमिकल नजरचुकीने पाणी समजून पिण्यास दिले. त्या बाटलीतील पाणी पिताच तरुणीला घशात जळजळ होऊ लागली. हा सर्व प्रकार दुकानदार मालकाच्या लक्षात आला.
यामुळे सदर तरुणीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे तिच्यासह संपूर्ण कुटुंब चांगलेच घाबरले होते. उपचारानंतर सदर तरुणीची प्रकृती स्थिर असून कोणताही धोका नाही. मात्र, कामगारांच्या बेपवाईचा फटका या कुटुंबाला सहन करावा लागला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/538652117812522/