सोलापूर : सोलापुरात वीज यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीचे कामे आज बुधवारी केली जातात. रामलाल चौक शाखेअंतर्गत आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास काम करताना विजेचा जोरदार शॉक बसला. यातील एकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एक कर्मचारी जखमी असून त्याची प्रकृती स्थिर आहे. Solapur: Two electricity personnel shocked, one killed while working on tree branches
वरिष्ठ तंत्रज्ञ शेख रब्बानी अहमद (वय अंदाजे ३७ वर्षे) व कंत्राटी कर्मचारी अझहर चाँद तांबोळी (वय अंदाजे २२ वर्षे) हे दोघे सिव्हील वीज उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ के.व्ही. रामलाल चौक फिडरवर रेल्वे स्टेशन परिसरातील एका ठिकाणी विजेच्या तारांना लागणाऱ्या फांद्या छाटण्याचे काम करत होते. यात महावितरणच्या वीज कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान दुदैवी मृत्यू झाला आहे.
वीज तारांची दुरुस्ती करताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने दोघांना विजेचा जोरात शॉक लागला. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले. यातील गंभीर अवस्थेत असणाऱ्या एकाला खासगी रुग्णालयात तर दुसऱ्याला सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/538599027817831/
गंभीर जखमी झालेले महावितरणचे कर्मचारी शेख रब्बानी अहमद यांनी उपचारास प्रतिसाद दिला नाही. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सायंकाळी घोषित केले. तर कंत्राटी कर्मचारी अझहर चाँद तांबोळी यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
शहरातील महावितरणच्या ‘क’ उपविभागामध्ये आज बुधवारी (दि.११ ) मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीचे कामे करत असताना ही घटना घडली. याकरिता त्यांनी महावितरणच्या शिडीगाडीची मदत घेतली होती. तरीही काम करताना अचानक लागलेल्या शॉकमुळे ते जखमी झाले आहेत. या दोन्ही कर्मचाऱ्यांना तातडीने अश्विनी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोघांपैकी शेख रब्बानी अहमद यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात होते. त्याचाच नंतर मृत्यू झाला. मृताच्या नातेवाईक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय बॉडी ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला आहे.
अपघात नेमका कशामुळे झाला, वीज पुरवठा बंद केल्याची खातरमजा या दोघांनी केली होती की नाही याची माहिती अद्याप समजली नाही. विद्युत निरीक्षकाच्या अहवालानंतरच अपघाताचे नेमके कारण निष्पन्न होणार आहे. या कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट दिले होते का नाही? याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/538648541146213/