लखनौ : योगी सरकारने उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत गाणे अनिवार्य करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक सत्रापासून सर्व मदरशांमध्ये प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन व्हावे यासाठी जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांना नियमितपणे देखरेख करावी लागणार आहे. मदरशातील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी, अशी योगी सरकारची इच्छा आहे. The national anthem has to be sung daily in all the madrasas yogi government
उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण परिषदेच्या रजिस्ट्रारने सर्व अल्पसंख्यांक कल्याण अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले आहेत. जारी केलेले निर्देश सर्व मान्यताप्राप्त, अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांमध्ये लागू असेल, असे सांगितले जात आहे. आजपासूनच या नियमाची अंमलबजावणी झाली आहे. मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हटलं जातंय की नाही याची पडताळणी देखील केली जाणार आहे. उत्तर प्रदेशांमध्ये सकाळी वर्ग सुरु होण्यापूर्वी दुआ पठण केलं जातं. पण आता दुआ पठणाबरोबरच राष्ट्रगीत म्हणणं हे देखील बंधनकारक असणार आहे.
उत्तर प्रदेशातील मदरशांना रमजानची सुट्टी होती. आता या सुट्ट्या संपल्या असून, पुन्हा मदरशांमधील शिक्षण सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मदरसा शिक्षण परिषदेने ९ मे रोजी प्रदेशातील सर्व अल्पसंख्यक कल्याण अधिकाऱ्यांना एक परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये २४ मार्च २०२२ रोजी झालेल्या परिषदेच्या बैठकीत मान्यता प्राप्त/अनुदानित/गैर अनुदानित मदरशांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रापासून मदरशांमधील प्रार्थनेबरोबर सर्व शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य असेल, असे निर्देश दिले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/539431234401277/
पण योगी सरकारच्या या निर्णयावर मुस्लिम समाजाने आक्षेप घेतल्याचे वृत्त आहे. मदरशांमध्ये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला राष्ट्रगीत गायलं जातं, मग ते रोज अनिवार्य करण्याची काय गरज आहे, असं मौलानांचं म्हणणं आहे. दुसरीकडे सरकारने हा निर्णय मुस्लिम समाजाच्या हिताचा असल्याचं सांगितलं आहे.
यूपी मदरसा बोर्डाचे अध्यक्ष डॉ. इफ्तिखार अहमद जावेद म्हणाले की, आजपासून राज्यात मदरसे सुरू झाले असून त्यांच्याकडे मुलं अभ्यासासाठी येऊ लागले आहेत. मदरशातील मुलं इतर सामान्य शाळेतील मुलांप्रमाणे दिसावीत आणि देश आणि जगात आपला ठसा उमटवता याव्यात यासाठी बोर्ड प्राधान्याने काम करत राहील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात मुस्लिम मुलांच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात संगणक असावा. मुस्लिम समाजाला पुढे नेण्याचा त्यांचा सकारात्मक विचार यातून दिसून येतो. हा विचार पुढे नेत आता नवीन सत्रापासून मदरशातील मुलांना धार्मिक शिक्षणाबरोबरच आधुनिक शिक्षणाची सक्ती केली जाईल अस बोर्डाने म्हटलं आहे. यासोबतच राष्ट्रवादाची भावना पुढे नेण्यासाठी ते दररोज राष्ट्रगीत गाणार असल्याचे म्हणाले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/539400434404357/