● माढ्यात कंटेनर थांबून असल्याने प्रकार आला उघडकीस
कुर्डूवाडी : कर्नाटकहून उत्तर प्रदेशकडे निघालेली व्हीआरएल लजिस्टिक लि. ट्रान्स्पोर्टच्या कंटेनर मधील २७ टन अंदाजे दीड कोटी रुपयांच्या सुपारीचा दोन चालकाने सोलापुरात परस्पर विल्हेवाट लावली. ही घटना मंगळवारी (ता. 10) दुपारी २.४० वाजताच्या सुमारास घडली. One and a half million out of UP ‘suparici Solapur made mutually disposal
हा प्रकार म्हैसगाव (ता. माढा ) येथे गाडी थांबून असल्याने उघडकीस आली. कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात व्हीआरएल लजिस्टिक लि. हुबळी कंपनीचे सोलापूर येथील असिस्टंट जनरल मॅनेजर केशव अनंतराव हिरासकर (मुळ रा. व्यंकटेशनगर विजापूर सध्या रा. भवानीपेठ सोलापूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली. चालक वसंतकुमार एस नारायणाप्पा (रा. बेंगलोर कर्नाटक) व चालक संतोष चंद्रप्पा एन्नर (रा. अंजीमनम जि. कर्नाटक) या दोघा संशयित चालकांवर कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अमित एन्टरप्रायझेस कर्नाटक यांचेकडून २७ टन २५० किलो वजनाची सुपारी घेऊन दि. ८ मे रोजी दुपारी २.४० वाजता हुबळीहून नोएडा उत्तरप्रदेश येथील धरमपाल सत्यपाल लि. या ठिकाणी पोहच करण्यासाठी गाडी ट्रक कंटेनर्स ( क्रमांक के. ए. २५ ए. ए. ०२५५) घेऊन निघाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/539235811087486/
हुबळी येथील कंपनीच्या मुख्य कार्यालयातून कंटेनरचे जीपीएस लोकेशन पाहिले असता ट्रक गेल्या १२ तासापासून कुर्डुवाडी – बार्शी रस्त्यावरील म्हैसगांव (ता. माढा) येथे रोडच्या कडेला उभी असल्याचे दाखवत होते.
दोन्ही चालकांच्या मोबाइलवर फोन केला असता बंद लागत होता. यामुळे हुबळी येथून सोलापूरच्या ट्रान्सपोर्ट कार्यालयात फोनवरून संपर्क करण्यात आला. फिर्यादी व त्यांचे सहकारी दिनेश गवशेट्टी दोघे सदर गाडी उभी असलेल्या म्हैसगांव या ठिकाणी आले असता कंटेनर आढळून आला. त्यामध्ये गाडीची कागदपत्रे होती. परंतू मालाची कागदपत्रे व दोन्ही चालक जागेवर नव्हते. गाडीच्या कंटेनरच्या मागणी दोन्ही लाॅकसह हिडन लाॅक सुद्धा तुटलेले होते व आत सुपारीचा माल दिसुन आला नसल्याने दोन्ही चालकांनी २७ टन सुपारीची परस्पर विल्हेवाट लावली असल्याचे समोर आले.
यामुळे त्यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोघां जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत वाघमारे करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/539335391077528/