□ संभाजीराजेंची अपक्ष लढण्याची घोषणा
मुंबई : राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 57 जागांसाठीची निवडणूक घोषित झाली आहे. येत्या 10 जून रोजी ही निवडणूक होणार आहे. उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक 11, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधून प्रत्येकी 6, बिहारमधून 5 आणि राजस्थान आणि कर्नाटकमधून 4 – 4 जागांवर निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातून पियुष गोयल, पी चिदंबरम, प्रफुल्ल पटेल, विकास महात्मे, संजय राऊत, विनय सहस्त्रबुद्धे यांच्या राज्यसभेच्या जागा रिक्त होणार आहेत. Voting on June 10 for Rajya Sabha seats in Maharashtra
निवडणूक आता जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी 31 मे पर्यंतही अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. 10 जून रोजी मतदान पार पडेल. राज्यसभेच्या 6 जागांपैकी पाच जागांवर भाजप आणि महाविकास आघाडीचे खासदार निवडून जातील. तर सहावी जागा रिक्त राहणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर राजकीय पक्षांच्या संख्याबळात बदल झालाय. त्यामुळे राज्यसभेच्या जागांसाठी आता संख्येचं गणित बदलल्याचं पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार असलेले केंद्रीय मंत्री पियुष गोयल, पी.चिदंबरम, प्रफुल्ल पटेल, डॉ. विकास महात्मे, संजय राऊत आणि डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांचा कार्यकाळ 4 जुलै 2022 रोजी संपत असल्याने राज्यातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण 57 जागांसाठी 10 जून 2022 ला निवडणूक घेण्यात येणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/539063911104676/
या निवडणुकांसाठी 24 मे रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. 31 मे ही अर्ज करण्याची अंतिम तारिख असून 1 जून रोजी अर्जांची छानणी होणार. 3 जून पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. 10 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. 13 जून 2022 रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.
यापूर्वीच्या संख्याबळानुसार तीन जागा भाजप, एक जागा राष्ट्रवादी कांग्रेस, एक जागा शिवसेना तर एका जागेवर काँग्रेस उमेदवार निवडून जात होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर या संख्याबळात बदल झाला आहे. आता भाजपच्या वाट्याला दोन जागा, तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा जाईल. त्यामुळे सहावी जागा रिक्त राहणार आहे. या जागेवर संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यावेळी त्यांनी मला सर्व राजकीय पक्ष मदत करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
अपक्ष म्हणून माझा कोणाला सन्मान करायचा असेल तर तो त्यांचा अधिकार असेल. मात्र सध्या तरी मी अपक्ष म्हणूनच लढणार असल्याचे ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/539035914440809/