बीड : बीड जिल्ह्याच्या आष्टीतील म्हसोबावाडी फाट्यावर कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात टेकवाणी कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका जणाची प्रकृती चिंताजनक आहे. 5 जण क्रेटा कारमधून नगरकडे जात असताना कार रस्त्याच्याकडेला जाऊन आदळली. दरम्यान, हे कुटुंब बीडमधील एका प्रतिष्ठित व्यापारी कुटुंब म्हणून ओळखले जाते. Four members of Tekwani business family killed in car accident
बीड येथील प्रसिद्ध व्यापारी असलेले टेकवणी कुटुंब गेल्या 50 वर्षांपासून शहरात वास्तव्यास आहे, ते पुण्याला कामानिमित्त गेले होते, बीडकडे परत येत असताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला.
बीडमधील प्रसिद्ध व्यापारी असलेल्या टेकवाणी कुटुंबातील पाच जण पुण्याहून बीडकडे येत होते. धामणगांव घाटात त्याचवेळी त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. या अपघातात टेकवाणी कुटुंबातील सुनील टेकवाणी, शंकर टेकवाणी, सतीश टेकवाणी यांच्यासह आणखी एकाचा जागीच मृत्यु झाला आहे. टेकवाणी कुटुंब बीडमधील एक प्रतिष्ठीत व्यापारी कुटुंब म्हणून ओळखले जाते. एकाच कुटुंबातील चौघांच्या झालेल्या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/539105834433817/
सुनील टेकवाणी, शंकर टेकवाणी, सतीश टेकवाणी यांच्यासह आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी घटनास्थळावरून 4 मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघातामुळे धामणगाव घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
टेकवाणी परिवार व्यापाऱ्यानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात परिचित आहे. कारंजा रोडवर त्यांचे जनरल स्टोअर्स, इलेक्ट्रिक दुकानासह, बियर बार आहे. टेकवाणी परिवार प्रसिद्ध व्यापारी म्हणून ओळखला जातो. टेकवाणी कुटुंबातील चौघे जण काही कामानिमित्त पुण्याला गेले होते. काम उरकून बीडकडे परत येत असताना आष्टी तालुक्यातील धामणगावजवळील म्हसोबावाडीच्या एका वळणावर गाडीचा ताबा सुटला. या वळणावर सुरक्षित कठडा नसल्यामुळे भरधाव गाडी झाडावर जाऊन आदळली.
○ शेअर बाजारात पाचव्या दिवशीही घसरण, सेन्सेक्स 1158 अंकांनी घसरला
#sharemarket #bazar #सुराज्यडिजिटल #marketnews
भारतीय शेअर बाजारात गुरुवारी सलग पाचव्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स 1158 अंकांनी किंवा 2.14% घसरून 52,930 वर बंद झाला, तर राष्ट्रीय बँकिंग शेअर्समध्ये दिसून आली.
#surajyadigital #share
शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी देखील 359 किंवा 2.22% अंकांनी घसरून 15,808 वर बंद झाला. सर्वात मोठी घसरण #sensex #bse #bsesensex #NSENifty