□ चंद्रभागेचे प्रदुषण रोखण्यासाठी शासकीय योजनांचा कृतीसंगम -सिईओ दिलीप स्वामी
□ नमामी चंद्रभागा अंतर्गत नदीकाठी सेंद्रीय शेतीचा जागर ..!
सोलापूर – नमामी चंद्रभागा अंतर्गत भीमा नदीचे प्रदुषण रोखणे साठी नदीकाठच्या शेती सेंद्रिय करणेसाठी अभियान हाती घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. To prevent pollution of Chandrabhaga, there will be awareness of organic farming along the river under Namami Chandrabhaga
जिल्हा परिषदेत आज भीमा नदी काठच्या गावात प्रदूषण रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजना बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. नवनाथ नरळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, तसेच कृषी विस्तार अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नमामी चंद्रभागा हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वोपतरीने प्रयत्न करणेत येत आहे. भीमा नदी काठच्या शेतीमध्ये होणारे रासायनिक खतांचा वापर कमी करून त्यांना सेंद्रीय शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत पशुपालन करणारे शेतकरी यांचे असलेले पशुच्या मल- मुत्राचे व्यवस्थापन करणेसाठी गांडुळखत प्रकल्प, स्लरी, तसेच कचरा पासून कंपोस्ट खत तयार करणे, गोबर गॅस, गोबरधन बाबत जनजागृती करून नदीकाठच्या शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती करणेत येणार आहे, असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
भीमा नदीकाठी असलेले शेतकरी भिमेच्या पाण्यात जनावरे धुतली जातात, यासाठी दुसरी उपाय योजना काय करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. नदीचे पात्राच्या बाजूने वृक्षारोपन करून जमिनीची धूप थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी चर्चा करण्यात आली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/539202401090827/
□ नदीकाठच्या गावात शेतकरी मेळाव्याचे आयोजन
भीमा नदी काठच्या गावात शेतकरी मेळावे घेऊन त्यांना शेतकरी यांना घनकचरा व्यवस्थापन व सेंद्रिय शेती बाबत मार्गदर्शन करणेत येणार आहे. २० मे नंतर पंढरपूर व माळशिरस तालुक्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
□ नदीकाठच्या 131 ग्रामपंचायती मध्ये प्रबोधनाचा जागर
भीमा नदी काठावर माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, माढा, करमाळा, व दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, या ९ तालुक्यांतून भीमा नदी वाहते. सुरूवातीला पायलट म्हणून दहा गावात ही मोहिम हाती घेणेत येत आहे. पंढरपूर व माळशिरस तालुक्यांतील नमामी चंद्रभागा अंतर्गत निवडलेल्या ग्रामपंचायती मध्ये याची सुरूवात करणेत येणार आहे. शासनाचे विविध योजनांचा कृतीसंगम करून चंद्रभागा प्रदुषणा पासून वाचविणेसाठी अभियान हाती घेणेत येत असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
□ सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आराखडेस सुरूवात – स्मिता पाटील
नदीकाठच्या सर्व ग्रामपंचायतीचा समावेश सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत १३१ ग्रामपंचायतीचा समावेश करणेत आला आहे. सध्या आराखडे बनविण्यास सुरूवात झाली आहे. गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन झाल्यास ब-याच प्रमाणात नदीचे प्रदुषण रोखण्यास मदत होणार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात या ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/539235811087486/