सोलापूर : ‘आरटीई’तून प्रवेश मिळालेल्या एका मुलाच्या पालकाकडून पाचशे रुपयांची मागणी करून तीनशे रुपये घेताना महापालिका शिक्षण मंडळातील महिला लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज शुक्रवारी रंगेहाथ पकडले. सेवा निवृत्तीला काही वर्षेच शिल्लक असताना त्या सापळ्यात अडकल्या आहेत. Solapur: A woman clerk was caught red handed while accepting a bribe of only Rs 300.
प्रभावती अंबादास वईटला (कस्सा) (वय 58) असे त्या लाचखोर महिला लिपिकाचे नाव आहे. ५८ वर्षीय महिला लिपिका काही वर्षाने रिटायर्ड होणार आहेत. मात्र त्यांना लाचेची दुर्बुद्धी सुचली आणि बक्षीस स्वरूपात ही रक्कम स्वीकारली होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सध्या बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्याअंतर्गत २५ टक्के मुलांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे.
आरटीईअंतर्गत नंबर लागलेल्या मुलांचे प्रवेश सध्या सुरु आहेत. तक्रारदाराच्या मुलाचा ‘आरटीई’तून नंबर लागला होता. त्याचे प्रवेशपत्र दिल्यानंतर बक्षीस म्हणून पाचशे रुपयांची मागणी केली होती. तेवढे पैसे नसल्याने त्या महिला लिपिकाने तक्रारदाराकडून तीनशे रुपये घेतले. यावेळेस परिसरात दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या महिलेला रंगेहाथ पकडले.
तुमचे आवडते ‘द लेमन न्यूज’ न्यूज पोर्टल The lemon news नावाने ‘फेसबुक’, ‘टेलिग्राम’ ‘कू’ Koo आणि ‘ट्विटर’ वरही उपलब्ध
https://www.facebook.com/109399567404448/posts/540032971007770/
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक उमेश महाडीक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस शिपाई स्वप्निल सणके, प्रफुल्ल जानराव, अतुल घाटगे, शिरीषकुमार सोनवणे, अर्चना स्वामी यांच्या पथकाने केली.
○ गुरसाळे बंधाऱ्यावरील १२ लोखंडी दरवाजाची चोरी
सोलापूर – कवठाळी (ता.पंढरपूर) येथे गुरसाळे बंधाऱ्यावरील १२ लोखंडी दरवाजे चोरट्याने पळविले. ही चोरी काल गुरुवारी (ता. 12) पहाटेच्या सुमारास घडली. कवठाळी येथील गुरसाळे बंधाऱ्यावर लोखंडी दरवाजे बसविण्यात आले आहे.
पहाटेच्या सुमारास चोरट्याने एकूण १२ दरवाजे तोडून गेले. चोरीस गेलेल्या दरवाजाची किंमत ६० हजार इतकी असल्याची फिर्याद बाळू मारुती रोकडे (रा. चिंचोली भोसे ) या कर्मचाऱ्याने पंढरपूर ग्रामीण पोलिसात दाखल केली. सहाय्यक फौजदार दिवसे पुढील तपास करीत आहेत.
□ सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्या रद्द
सोलापूर : सोलापूर विभागाने सोलापूरच्या दिशेच्या बाजूस दौंड यार्डमध्ये सबवे (रोड अंडर ब्रीज) बांधण्यासाठी १७ दिवसांसाठी १३ ते २९ मे पर्यंत वेगवेगळ्या कालावधी करिता ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या दरम्यान सोलापूर विभागातून धावणाऱ्या गाड्या रद्द, आशिंक रद्द, मार्ग परिवर्तन करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
अंशिक व काही गाड्यांचे मार्ग परिवर्तन करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी रद्द करण्यात आलेल्या गाड्या व मार्ग परिवर्तन करण्यात आलेल्या गाड्यांची माहिती घेऊन योग्य तो प्रवास सुनिश्चित करावा, असेही आवाहन करण्यात आले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/539963581014709/