नवी दिल्ली : पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशन जवळील एका इमारतीतील काल शुक्रवारी (ता. 13) संध्याकाळी भीषण आग लागली होती. या आगीत होरपळून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. Mundka fire case: 27 killed, two factory owners arrested in Delhi building fire
या दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी आगीच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दु:ख व्यक्त केले आहे. अशा कठीण काळात त्यांनी मृतांच्या कुंटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत संवेदना व्यक्त केल्या आहेत, ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे, ‘दिल्लीतील भीषण आगीमुळे झालेल्या जीवितहानीमुळे खूप दुःख झालं आहे. शोकाकुल कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे.’
पश्चिम दिल्ली परिसरातील काल एका इमारतीला संध्याकाळी भीषण आग लागली होती. या आगीप्रकरणी कारखाना मालकांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या आगीची चौकशीची करण्यात येणार आहे. दिल्लीतील मुंडका येथे लागलेल्या आगीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एफएसएलची टीम घटनास्थळी जाणार आहे. एफएसएल टीम आगीचे कारण शोधून काढेल.
सायंकाळी पावणेपाच वाजता लागलेली आग मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सीसीटीव्ही तयार करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात आग लागली. तीन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हे कार्यालय होतं.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
Delhi Mundka Fire | Morning visuals from the spot where a massive fire broke out in a building yesterday, May 13
"27 people died and 12 got injured in the fire incident," said DCP Sameer Sharma, Outer District pic.twitter.com/wRErlnj3h0
— ANI (@ANI) May 14, 2022
अग्निशमन दलाने काल रात्री 10 वाजता माहिती देत सांगितलं होतं की, ‘तीन मजली इमारतीला भीषण आग लागली. आगीमध्ये मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही आग इतकी भीषण होती की सुमारे आठ तास आग आणि धुरांचे लोट सर्व परिसरात पसरले होते. यानंतर एनडीआरएफच्या पथकालाही बचावकार्यासाठी पाचारण करण्यात आले.’ यानंतर बचाव पथकाला रात्री एक वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
दिल्ली पोलिसांनी अधिक माहिती देत सांगितले की, इमारतीतून 60-70 लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आगीची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. इमारतीत अडकलेल्या लोकांना खिडकीच्या काचा फोडून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती होताच अग्निशामक दलाचे १५ बंब घटनास्थळी दाखल झाले. तसेच आगीची तीव्रता वाढत असल्यामुळे आणखी काही बंब बोलवण्यात आले. तर दुसरीकडे आगीची घटना समोर येताच पोलिसांनी तातडीने खबरदारी म्हणून या भागात फौजफाटा तैनात केला तसेच या भागात नाकेबंदी केली होती.
इमारतीत अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत. आग लागली तेव्हा या कार्यालयांमध्ये अनेक लोक उपस्थित होते. आग लागल्याचं लक्षात येताच अनेकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण आगीनं भीषण रुप धारण केल्यानं बहुतेक जण अडकून पडले होते. काही लोकांनी तर जीव वाचवण्यासाठी इमारतीतून बाहेर उड्या घेत आपला जीव वाचवला. सुरुवातीला पहिल्या मजल्यावर आग लागली नंतर वेगानं ती वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली. खिडक्या तोडून सुमारे ६० लोकांना वाचवण्यात यश मिळवलं. दोरखंडाच्या मदतीनं लोकांना वाचवण्यात यश आल्याचे वृत्त आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/540330460978021/