सोलापूर – ग्रामपंचायतीच्या शिपायाला शिवीगाळ करीत कात्रीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना आष्टी (ता. मोहोळ) येथे बुधवारी (ता. 11) सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात मोहोळच्या पोलिसांनी एका टेलरला अटक करून पोलिस कोठडी घेतली आहे. Taylor arrested for attacking Gram Panchayat peon with scissors
अमोल जगन्नाथ होनकळस (वय ३७ रा. आष्टी) असे जखमी झालेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ते बुधवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयाकडे निघाले होते. त्यावेळी टेलर दुकानातील मोहन बजरंग माने ( वय४०) याने त्याला ग्रामपंचायत कर्मचारी पैसे खाऊन काय पण काम करतात, असे म्हणत शिवीगाळ केली. होनकळस यांनी तू नेहमी मला शिवीगाळ का करतो? असे विचारले असता त्याने कात्री घेऊन त्यांना मारहाण केली. हाताला आणि गळ्यावर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून हवालदार चव्हाण पुढील तपास करीत आहेत .
□ अस्थी विसर्जनासाठी आलेल्या तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी पळविली
सोलापूर – आजीच्या अस्थि विसर्जनासाठी कोल्हापूरहून आलेल्या एका तरुणीच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्याने पळविली. ही घटना पंढरपूर शहरातील नामदेव पायरीजवळ गुरुवारी (ता. 12) सकाळच्या सुमारास घडली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/540330460978021/
श्वेता संजय शिंदे (वय २५ रा. करवीर जि. कोल्हापूर) ही तरुणी गुरुवारी मयत आजीच्या अस्थि विसर्जनासाठी पंढरपुरात आली होती. अस्थिचे विसर्जन केल्यानंतर ती विठ्ठल मंदिराचे दर्शन घेऊन नामदेव पायरी जवळ आली होती. यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी तिच्या गळ्यातील ८ ग्रॅम सोन्याची चेन पळवली. या घटनेची नोंद पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात झाली. हवालदार ढेरे पुढील तपास करीत आहेत .
● गुरसाळे बंधाऱ्यावरील १२ लोखंडी दरवाजाची चोरी
सोलापूर – कवठाळी (ता.पंढरपूर) येथे गुरसाळे बंधाऱ्यावरील १२ लोखंडी दरवाजे चोरट्याने पळविले. ही चोरी काल गुरुवारी (ता. 12) पहाटेच्या सुमारास घडली. कवठाळी येथील गुरसाळे बंधाऱ्यावर लोखंडी दरवाजे बसविण्यात आले आहे.
पहाटेच्या सुमारास चोरट्याने एकूण १२ दरवाजे तोडून गेले. चोरीस गेलेल्या दरवाजाची किंमत ६० हजार इतकी असल्याची फिर्याद बाळू मारुती रोकडे (रा. चिंचोली भोसे ) या कर्मचाऱ्याने पंढरपूर ग्रामीण पोलिसात दाखल केली. सहाय्यक फौजदार दिवसे पुढील तपास करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/540284324315968/