Sunday, January 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

Uddhav Thackeray Speech मुन्नाभाई फिरत आहे, उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरेंना टोला

फडणवीस चढले जरी असते तरी बाबरी त्यांच्या वजनाने खाली आली असती

Surajya Digital by Surajya Digital
May 14, 2022
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
0
Uddhav Thackeray Speech मुन्नाभाई फिरत आहे, उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरेंना टोला
0
SHARES
133
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

● फडणवीस चढले जरी असते तरी बाबरी त्यांच्या वजनाने खाली आली असती

मुंबई : मुंबईतल्या सभेत आज राज ठाकरेंवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. ‘मुन्नाभाई चित्रपटात मुन्नाभाई जसा गांधीजी बनला होता, तसा एक बाळासाहेब ठाकरे सध्या फिरत आहे, खांद्यावर शाल आहे, त्याला आपण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे झाल्यासारखे वाटत आहे, अशा शब्दात ठाकरे यांनी राज यांना टोला लगावला आहे. काही तरी केमीकल लोचा झाला आहे, असेही उद्धव म्हणाले. Uddhav Thackeray Speech Munnabhai is walking, Uddhav Thackeray’s tola to Raj Thackeray

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतल्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. जवळपास एक तास केलेल्या भाषणात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. मुन्नाभाई चित्रपटात कस त्याला गांधीजी दिसतात तस एकाला बाळासाहेब दिसतात, भगवी शाल घालुन फिरतो. म्हंटल अरे तो मुन्नाभाई तर लोकांच भल तरी करतो. त्यात शेवटी कळत की केमिकल लोचा झाला आहे, हे तसंच आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे नाव न घेता हल्लाबोल केला आहे.

मुंबईत आज शिवसेनेच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. “देवेंद्र फडणवीस तुम्ही जर खरंच तिकडे गेला असता तर तुमच्या फक्त वजनाने बाबरी खाली आली असती.” अशा शब्दात ठाकरे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. ‘तुम्ही म्हणता की आम्ही बाबरी पाडली, ती काय शाळेची सहल होती का? की चला चला चला बाबरी पाडायला चला… अरे तुमचं वय काय? बोलता काय?’ असेही ठाकरे म्हणाले.

देवेंद्रजी, बाबरी पाडली तेंव्हा तुमच वय काय होतं? ती काय शाळेची पिकनिक होती? आज मी तुम्हांला विचारतो, तुम्हीं हिंदुत्वासाठी काय केलतं? तुम्ही बाबरी पाडायला गेला नव्हता. देवेंद्र जर बाबरी पडण्यासाठी तुम्ही गेला असता तर तुमच्या वजनाने बाबरी पडली असती, असा टोला मारला.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

आमचं हिंदुत्व कसं आहे? हे आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलंय. ते आम्हाला म्हणाले होते की, मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको तर देशात अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. तोच धागा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आमचं हिंदुत्व हे गदाधारी आहे, बाकीच्यांचं हिंदुत्व घंटादारी आहे. बसा बडवत, काय मिळालं घंटा? अहो गदा पेलायला पण हातामध्ये ताकद असली पाहिजे. अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, ‘देवेंद्र फडणवीस एकदा बोलले होते की, यांचं हिंदुत्व गदाधारी नाही, गधाधारी आहे. हो त्यांचं बरोबर आहे, आमचं हिंदुत्व गधाधारी होतं. पण अडीच वर्षांपूर्वी आम्ही त्यांना सोडलं. आमचे जे काही जुने फोटो त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांचा गैरसमज होत असेल की, आमचं हिंदुत्व गधाधारी आहे. पण अडीच वर्षांपूर्वी आम्ही त्यांना सोडलं. त्या गध्याला आम्ही सोडून दिलं, कारण त्याचा उपयोग नाही. शेवटी गाढव ते गाढवच शेवटी. या गाढवाने आम्हाला लाथ मारायच्या आधी आम्हीच त्यांना लाथ मारली’, असंही ते म्हणाले.

 

● … तर भाजप दाऊदला मंत्री बनवतील – उद्धव ठाकरे

》दहशतवादी दाऊद इब्राहिम म्हणाला मी भाजपमध्ये येतो तर त्याला ते मंत्री बनवतील, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे आज मुंबईतल्या शिवसेनेच्या सभेत बोलत होते. तसेच ‘मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे, आमचं हिंदुत्व गदाधारी आहे, बाकीच्यांचे घंटाधारी आहे’, असे ठाकरे म्हणाले.

● आरएसएसची टोपी काळी का?

गेल्या वेळी त्यांनी भगव्या टोप्या घातल्या होत्या. भगव्या टोप्या कशाला? हिंदुत्व डोक्यात असतं. डोक्यातल्या मेंदूत असतं. टोपीवर हिंदुत्व नसतं. भगवी टोपी घालून तुम्ही हिंदुत्व दाखवत असाल, तर आरएसएसची टोपी काळी का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला. आम्ही हिंदू आहोत की नाही, हे ठरवणारे तुम्ही नाहीत. तुमचं विकृत हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाचा विचार दिला, तुम्ही हिंदुत्वाचा विकार करताय, असंही ठाकरे म्हणाले.

 

□ शिवसेनेची सभा – उद्धव ठाकरे म्हणाले…

– कश्मीरी पंडितांना सुरक्षा नाही आणि इथे भोकं पडलेल्या तिनपटांना सुरक्षा दिली जातेय. बापाचा माल आहे का तुमच्या. जनतेचा पैसा आहे तो. या तिनपाटांना कशाला हवी सुरक्षा.

– काँग्रेसबरोबर गेलो तरी आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही.

 

– शिवसेना ही बाळासाहेबांची नाही म्हणता मग तुमचा पक्ष अटलजींचा आहे का ?.

– मुंबईचा लचका तोडणा-यांचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही.

– आमची 25 वर्ष युतीत सडली.

– आम्ही ओळखलं नाही की हे मित्र नाही शत्रू आहोत.

– युती तुटल्यानंतर त्यांचा भेसूर चेहरा बघतोय तेव्हा प्रश्न पडतो की हाच का तो मित्र ज्याला बाळासाहेबांनी जपलं होतं

– मला सामनातील एक लेख तरी काढून दाखवा ज्यात आम्ही मोदीजींचा अपमान केला आहे.

 

 

Tags: #cm #UddhavThackeray #Speech #Munnabhai #walking #Uddhav #mumbai #tola #RajThackeray#मुन्नाभाई #फिरत #उद्धवठाकरे #राजठाकरे #टोला #मुंबई #भाषण
Previous Post

शरद पवारांवर टीका, भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना मारहाण

Next Post

धक्कादायक! पालघर जिल्ह्यात एका वर्षात 20 मातांचा मृत्यू

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
धक्कादायक! पालघर जिल्ह्यात एका वर्षात 20 मातांचा मृत्यू

धक्कादायक! पालघर जिल्ह्यात एका वर्षात 20 मातांचा मृत्यू

वार्ता संग्रह

May 2022
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697