Sunday, January 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

धक्कादायक! पालघर जिल्ह्यात एका वर्षात 20 मातांचा मृत्यू

Shocking! In Palghar district 20 mothers die in one year child marriage

Surajya Digital by Surajya Digital
May 15, 2022
in Hot News, महाराष्ट्र
0
धक्कादायक! पालघर जिल्ह्यात एका वर्षात 20 मातांचा मृत्यू
0
SHARES
37
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

● प्रबोधनाअभावी बालविवाह फोफावतोय

पालघर : आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यातील भयानक परिस्थिती समोर आली आहे. प्रसूती झाल्यानंतर मरणाऱ्या महिलांची गेल्या वर्षातील (2021) संख्या 20 वर असल्याचा अहवाल समोर आला आहे. माता मृत्यूमुळे पालघर जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मातांना योग्य आरोग्य सेवा न मिळाल्यामुळे हे माता मृत्यू होत आहेत, असे सांगितले जाते. Shocking! In Palghar district 20 mothers die in one year child marriage

नवीन पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊनही आरोग्य, कुपोषण, माता मृत्यू, बेरोजगारी आणि इतर समस्याही जिल्ह्यातील नागरिकांना अजूनही तशाच भेडसावत आहेत. आरोग्य सेवेत आणखीन प्रगती झालेली नाही. पालघर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा नेहमीच कुचकामी ठरत असून आजचे चित्र सध्याही जैसे थे असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.

पालघर जिल्हा स्थापनेपासून ते आतापर्यंत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक माता मृत्यूची नोंद गेल्या वर्षी (2021-2022) झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात विविध कारणामुळे 20 माता मृत्यूची नोंद झाली आहे. तर 294 बालमृत्यूची नोंद झाली आहे. बालमत्यूचा आकडा कमी होत असला तरी माता मृत्यूचा आकडा चिंताजनक आहे. याआधी 2017-18 मध्ये 19 माता मृत्यूंची नोंद झाली होती.

 

गेल्या सात वर्षात सर्वाधिक माता मृत्यू झाल्यामुळे जिल्हा प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत. माता मृत्यूमुळे पालघर जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मातांना योग्य आरोग्य सेवा न मिळाल्यामुळे हे माता मृत्यू होत आहेत, असे सांगितले जाते. याचबरोबरीने पालघर जिल्ह्यात ग्रामीण बहुल भागांमध्ये गरोदर मातांना असलेल्या रक्ताशय याबरोबर उच्च रक्तदाब, मुदतपूर्व प्रसूती, घरी प्रसुती करणे अशा कारणांमुळेही माता मृत्यूची नोंद झालेली आहे.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत माता बाल संगोपन कार्यक्रमाअंतर्गत मातांची तपासणी व त्यांच्या आजाराच्या नोंदी ठेवल्या गेल्या असल्या तरी उपजिल्हा रुग्णालय यासह ग्रामीण रुग्णालयांमध्ये मातांना प्रसूतीसाठी योग्य त्या सेवा मिळाल्या नसल्यामुळे त्यांचे मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे माता मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

□ मातामृत्यू थांबवण्यासाठीचे प्रयत्न तोकडे

शासकीय प्रसूतीगृहामध्ये अनेक कारणे सांगून महिलांना इतरत्र उपचारासाठी पाठवले जाते. त्या दरम्यान मातांचा मृत्यू झाल्याचेही कारण समोर आले आहे. एकंदरीत आरोग्य विभागाच्या काही अपयशामुळे माता मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असले तरी मातामृत्यू थांबवण्यासाठी हे प्रयत्न कमी पडत असल्याचे आरोप काही सेवाभावी संस्थांकडून केले जात आहेत.

ग्रामीण बहुल भागांमध्ये काही गरोदर माता शासकीय आरोग्य संस्थांच्या कक्षेतून बाहेर राहत असल्याने त्यांच्या मृत्यूची नोंद किंवा त्यांची नोंद शासन दरबारी होत नाही. त्यामुळे मातामृत्यूचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. अलीकडच्या काळामध्ये कोरोना हे मातामृत्यू होण्याचे प्रमुख कारण आहे. आरोग्य विभागाचे संपूर्ण लक्ष कोरोनावर केंद्रित झाल्यामुळे माता यांच्यासाठी असलेल्या आरोग्य सेवांवर दुर्लक्ष झाले. परिणामी माता मृत्यू वाढत गेले.

□ प्रबोधनाअभावी बालविवाह फोफावतोय

शासकीय आरोग्य संस्थांमध्ये प्रसूतीसाठी मोजकीच रुग्णालय उपलब्ध असल्याने अनेक मातांना प्रसूतीसाठी फरपट करावी लागली. गेल्या सात वर्षांतील सर्वाधिक मातामृत्यू गेल्यावर्षी झाल्यामुळे ही बाब आरोग्य व्यवस्थेची झोप उडवणारी आहे मात्र आरोग्यव्यवस्था हवे तसे प्रयत्न करत असल्यामुळे मातामृत्यू होत असल्याचे आरोप केले जात आहे.

ग्रामीण भागांमध्ये बाल विवाह सारख्या अनिष्ट रुढी परंपरा अजूनही कमी झालेल्या नाहीत पालघर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात पाचशेहून अधिक बालविवाह झाल्याचे अलीकडे एका अहवालात म्हटले होते न्यायालयानेही या संदर्भात राज्य शासनाला फटकारले होते.

बाल विवाह मुळे कुपोषण आणि मातामृत्यूसारखे गंभीर परिणाम समोर येत आहेत. ग्रामीण भागांमध्ये शिक्षण आणि प्रबोधन नसल्यामुळे बालविवाह फोफावत आहेत. याचे प्रमाण कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषद त्यांच्यामध्ये जागरुकता आणून मातामृत्यू कमी करण्यासाठी निश्चित प्रयत्न करेल आणि तो आकडा कमी होईल अशी आशा आहे, असं पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण यांनी म्हटलं आहे.

 

Tags: #Shocking! #Palghar #district #mothers #die #oneyear #child #marriage#धक्कादायक! #पालघर #जिल्हा #एकावर्षात #बालविवाह #प्रयत्न #माता #मृत्यू
Previous Post

Uddhav Thackeray Speech मुन्नाभाई फिरत आहे, उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरेंना टोला

Next Post

केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी; केतकीने स्वत: केला युक्तिवाद; पोस्ट डिलीट न करण्यावर ठाम

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी; केतकीने स्वत: केला युक्तिवाद; पोस्ट डिलीट न करण्यावर ठाम

केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी; केतकीने स्वत: केला युक्तिवाद; पोस्ट डिलीट न करण्यावर ठाम

वार्ता संग्रह

May 2022
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697