□ राज्य निमंत्रित खो खो स्पर्धा
सोलापूर : वाळवा (जि. सांगली) येथे सुरू झालेल्या राज्य निमंत्रीत खो खो स्पर्धेत सलामीच्या दिवशी ग्रिफीन जिमखाना ठाणे संघाने कवठे पिरानच्या (जि. सांगली) हिंद केसरी स्पोर्ट्स क्लबवर तर वेळापूरच्या (जि.सोलापूर) अर्धनारी नटेश्र्वर क्रीडा मंडळाने मुंबई उपनगरवर एका गुणाने मात मात केली. Kho kho competition beat Sangli of Thane and Mumbai suburb of Solapur by one point
पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत ठाणे संघाने कवठे पिरानवर १७-१६ अशी एका गुणाने मात केली. मध्यंतराच्या ७-९ अशा पिछाडीवरून संकेत कदमच्या (३.००, १.३० मिनिटे व २गुण) अष्टपैलू खेळामुळे ठाण्याने सामना खेचून आणला.
दुसऱ्या सामन्यात वेळापूरने मध्यंतराच्या ६-६ अशा बरोबरीनंतर मुंबई उपनगरला १५-१४ असे नमविले. रामजी कश्यप (३.४०,१.४० मिनिटे व २गुण) व राहूल सावंतने (२.१०,१.३० मिनिटे व ४ गुण) अष्टपैलू खेळी करीत सामना खेचून आणला. उपनगराच्या अक्षय भांगरे याची खेळी अपुरी पडली. त्याने २.४०,१.३० मिनिटे संरक्षण करीत २ गडी बाद केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/541818407495893/
या स्पर्धेत राज्यातील १६ संघानी भाग घेतला आहे. स्पर्धेचे उद्घाटन सहकार मंत्री विश्वजित कदम, आमदार मानसिंगराव नाईक, हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे मार्गदर्शक वैभवकाका नायकवडी, खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव गोविंद शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.