Wednesday, February 8, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

Solapur crime माळशिरसमध्ये पैशासाठी मुलानेच केला आईचा खून; सोलापुरात लग्नासाठी आजीचा खून

In time, the son killed his mother for money; Grandmother's murder for marriage in Solapur

Surajya Digital by Surajya Digital
May 17, 2022
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
Solapur crime माळशिरसमध्ये पैशासाठी मुलानेच केला आईचा खून; सोलापुरात लग्नासाठी आजीचा खून
0
SHARES
114
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

□ पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत टाकले विहीरीत

□ आरोपींना ७ दिवसाची कस्टडी

श्रीपूर : जांबुड (ता. माळशिरस) येथील सेक्शन नंबर १५ येथील ११ मे रोजी सायंकाळी 4 वाजण्याचे सुमारास भुसनर यांचे शेती गट नंबर ४९१ मधील एका विहीरीजवळ जांबूड येथे मयत झाल्याने अकलूज पोलिस स्टेशन अ. म. नं ४१/२२ सी. आर. पी. सी. १७४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. In time, the son killed his mother for money; Grandmother’s murder for marriage in Solapur

फिर्यादीची पत्नी सुरेखा तुकाराम बाबर (वय ६५ ) हिला माझा मुलगा प्रदीप तुकाराम बाबर तसेच सुन मोनाली प्रदिप बाबर दोघे १५ सेक्शन जांबूड (ता माळशिरस) यांनी जमीन विकून आलेल्या पैशाचे तसेच जांबूड येथील जमिनीचे कारणावरून आई सुरेखा तुकाराम बाबर यांच्या डोक्यात दगड घालून मारुन टाकले. हा सदर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने प्रेत विहीरीत टाकले, अशी तक्रार तुकाराम बाबर (वय ७० ) यांनी अकलुज पोलिस स्टेशन येथे दिली आहे.

अकलुज पोलिस स्टेशनला गु. र. नं. ३४९/२०२२ कलम ३०२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तपास अप्पर पोलीस अधीक्षक हेमंत जाधव, अकलूज पोलिस उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस अधिकारी सारीका शिंदे, ए. एस. आय. बाळासाहेब पानसरे, हेड कॉन्स्टेबल किशोर गायकवाड यांनी तपास केला.

आरोपींना ताब्यात घेऊन न्यालयासमोर उभे केले असता त्या नवरा बायकोला ७ दिवसाची पोलिस कस्टडी देण्यात आली आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस अधिकारी सारीका शिंदे या करीत आहेत.

□ लग्नासाठी नातवाने केला आजीचा खून

सोलापूर : लग्‍न का लावून देत नाही म्हणून नातवाने आजीच्या डोक्यात काठीने मारून तिचा खून केल्याची घटना शेळगी परिसरातील आदर्श नगरात घडली.

शेळगी येथील मित्र नगरात राहणाऱ्या मालनबी हसनसाब नदाफ (वय ७०) यांचा खून त्यांच्याच नातवाने केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. सलीम जहाँगीर नदाफ (वय २५)असे त्या नातवाचे नाव असून जोडभावी पेठ पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

सलीमच्या आईचा तो लहान असतानाच मृत्यू झाला होता. वडिलांनीही दुसरे लग्न केल्याने त्याचा सांभाळ आजी करीत होती. कर्नाटकातील जिरंकली येथून आजीने त्याला सोलापुरात बोलावून घेतले होते. याठिकाणी तो काहीच काम करीत नव्हता. माझे लग्न करून दे म्हणून तो आजीकडे सारखा तगादा लावत होता. आजीने त्याकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे कर्नाटकला जाण्यासाठी तो आजीला पाचशे रुपये मागत होता. आजी पैसेही देत नसल्याच्या रागातून त्याने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत फिरोज शकूर नदाफ (वय 25, रा. आदर्श नगर, मित्रनगर, शेळगी, बाबासाब हसनसाब पटेल यांच्या घरात भाड्याने, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सलीम जहाँगीर नदाफ (रा. जिरंकली, कर्नाटक सध्या आदर्शनगर, मित्रनगर, शेळगी, बाबासाब हसनसाब पटेल यांच्या घरात भाड्याने, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालनबी हसनसाब नदाफ (वय 70, रा. आदर्शनगर, मित्रनगर, शेळगी, बाबासाब हसनसाब पटेल यांच्या घरात भाड्याने, सोलापूर) असे खून झालेल्या आजीचे नाव आहे. 14 मे रोजी सायंकाळी फिरोज नदाफ हे घरात झोपले होते. त्यावेळी फिरोज यांची मावस आजी मालनबी नदाफ या घरासमोरील पटांगणात फरशीवर बसल्या होत्या. त्यावेळी फिरोज याच्या मामाचा मुलगा सलीम नदाफ याने मालनबी यांना तु माझे लग्न का लावून देत नाही, उगाच कर्नाटक येथून बोलावून का घेतले? असे म्हणून मालनबी यांच्या डोक्यात काठीने मारहाण करून जखमी केले.

त्यावेळी फिरोज, त्याची बहिण व बहिणीचा पती यांनी जखमी मालनबी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरु असताना मालनबी यांचा मृत्यू झाला. याबाबत जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात खुनाचा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक व्हट्टे पुढील तपास करीत आहेत. खून करणार्‍या नातवाला न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

 

Tags: #time #son #killed #mother #money #Grandmother's #murder #marriage #Solapur#वेळापूर #पैशासाठी #मुला #आई #खून #सोलापूर #लग्न #आजी #खून #गुन्हेगारी
Previous Post

Kho kho competition खो-खो स्पर्धा : ठाणेची सांगलीवर तर सोलापूरची मुंबई उपनगरवर एका गुणाने मात

Next Post

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात

वार्ता संग्रह

May 2022
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697