मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातातून संग्राम जगताप हे थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या बीएमडब्ल्यू कारची आणि बसची धडक झाली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला आहे. मुंबई पुणे महामार्गावर पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला आहे. NCP MLA Sangram Jagtap’s car had a terrible accident
सीट बेल्ट लावलेला असल्याने आणि कारमध्ये अत्याधुनिक सुरक्षा असल्याने जगताप व त्यांचा चालक सुखरूप बचावले. आमदार जगताप यांना सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. परंतु एसटी बस आणि बीएमडब्लू गाडीची जोरदार धडक झाली आहे.
हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये गाडीच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. तर एसटीचा मागचा भागसुद्धा चेंबला आहे. मुंबई-पुणे महामार्गावर हा अपघात झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप भीषण अपघातामधून बचावले आहेत. त्यांची बीएमडब्लू गाडी आणि एसटी बसची धडक झाली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर हा अपघात झाला. अपघाताची तीव्रता भयानक होती. गाडीचा चक्काचूर झाला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/542506570760410/
आज पहाटे 5.30 वाजेच्या दरम्यान पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर मुंबईपासून काही अंतरावर रसायनी जवळ हा अपघात घडला आहे. जगताप यांच्या गाडीच्या पुढे एक एसटी बस जात होती. ती तिसऱ्या लेनमधून जात होती. मात्र पुढे रस्ता बंद असल्याचे लक्षात आल्यावर एसटी चालकाने अचानकपणे लेन बदलून गाडी थेट पहिल्या लेनमध्ये आणली. लेन बदलून अचानक एसटी बस पुढे आल्याने जगताप यांचा चालक गाडीवर नियंत्रण मिळवू शकला नाही. त्यामुळे कार बसवर मागील बाजूने धडकली. आमदार संग्राम जगताप अपघाताच्या वेळी गाडीमध्ये होते. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही.
आमदार संग्राम जगताप यांना कोणतीही दुखापत झाली नाही. पहाटे ५.३० वाजताच्या दरम्यान ते प्रवास करत होते. महामार्गावर रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा अपघात झाला आहे. आमदार संग्राम जगताप सुखरुप आहेत. दरम्यान अपघातानंतर मुंबई-पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्ठळी धाव घेऊन वाहतूक कोंडी सुरळीत केली आहे.
दरम्यान आमदार जगताप यांच्या गाडीला अपघात कसा झाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच आमदार जगताप यांनी या अपघाताबद्दल अद्याप कोणतेही मत व्यक्त केले नाही. दुसऱ्या वाहनातून जगताप पुढे रवाना झाले. आता ते मुंबईला पोहोचले आहेत आणि त्यांनी कामही सुरु केले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/542505710760496/