सोलापूर : विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत ऐनवेळी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर लढलेले माजी आमदार दिलीप माने यांनी पुन्हा एकदा दक्षिण सोलापूर या मूळ मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. तीन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. Dilip Mane’s ‘Invasion’ is again the ‘Door’ of the South; Solapur assembly politics of interest will have to be taken with everyone
दिलीप माने सध्या शिवसेनेत असले तरी मनाने राष्ट्रवादींच्या जवळ आहेत. त्यामुळे ते कोणत्या पक्षाच्या चिन्हावर विधानसभा लढणार, हे मात्र अस्पष्ट आहे. शहर मध्यपेक्षा दक्षिण आपल्याला सुकर जाईल हे लक्षात आल्यानंतर दिलीप माने यांची स्वारी पुन्हा दक्षिणेच्या दारी वळली आहे. दिलीप माने हे २००९ मध्ये काँग्रेस पक्षाच्या चिन्ह वर दक्षिण सोलापूरमधून विधानसभेवर निवडून आले होते.
त्यानंतरच्या २०१४ च्या निवडणुकीत मात्र मोदी लाटेत त्यांचा दक्षिण सोलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे सुभाष देशमुख यांच्याकडून पराभव झाला. मूळच्या उत्तर सोलापूर तालुक्याचे विभाजन होऊन माने यांचे वर्चस्व असलेला बराचसा भाग हा दक्षिण सोलपूर मतदारसंघाशी जोडला गेला आहे, त्यामुळे २०१४ मध्ये झालेला पराभव हा त्यांच्याशी धक्कादायक होता. पराभवानंतरही त्यांनी मतदारसंघाशी संपर्क कायम ठेवला होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/541818407495893/
विविध सहकारी संस्था, बँका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील सत्ता या माध्यमातून दिलीप माने यांनी कार्यकर्त्यांचे जाळे उभे केले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने जिंकलेल्या जागा आणि राज्यातील युतीच्या दिशेने वाहणारी हवा पाहून माने यांनीही पक्षांतराचा निर्णय घेतला. त्यात त्यांनी शिवसेनेत जाणे पसंत केले, त्यामागे अर्थातच तत्कालीन जलसंधारण मंत्री तानाजीराव सावंत यांचा हात होता. शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेऊनही दिलीप माने यांना शहर मध्यचे अपेक्षित लक्ष्य साधण्यात अपयश आले. मोठी ताकद लावूनही त्यांना एकेकाळच्या सहकारी प्रणिती शिंदे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राजकीय घडामोडी घडून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाची महाविकास आघाडी सत्तेवर आली. माने सध्या शिवसेनेत असले तरी त्यांची राष्ट्रवादीशी वाढलेली जवळीक लपून राहिलेले नाही. थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी ते संपर्क ठेवून आहेत. विधानसभा निवडणुकीस आणखी अवकाश असला तरी समाजोपयोगी कामाच्या माध्यमातून त्यांनी दक्षिण सोलापूरवर पुन्हा लक्ष्य केंद्रित केले आहे. त्या ठिकाणी त्यांची पुन्हा सुभाष देशमुख यांच्याशी लढत होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने माने यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघातून जोरदार पुनरागमन करण्याची तयारी चालवली आहे.
》 सर्वांना सोबत घेऊन जाणे होणार हिताचे
माजी आमदार दिलीप माने यांचे राजकारण शह-काटशहाच्या राहिले आहे. त्यामुळे २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्याच पक्षातील बाळासाहेब शेळके, सुरेश हसापुरे यांनी त्यांच्या विरोधात लढत दिली होती. त्यामुळे त्यांचा पराभव झाला होता, यंदा पुन्हा दिलीप माने यांनी दक्षिणवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे बाळासाहेब शेळके, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे यांच्यासह अनेक नेत्यांना सोबत घेऊन जाणेच दिलीप माने यांच्या हिताचे असणार आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/541806664163734/