Sunday, January 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

web world Ranbazar वेबविश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’ !

'Ranbazar' Prajakta Mali, who shook the web world

Surajya Digital by Surajya Digital
May 17, 2022
in Hot News, टॉलीवुड
0
web world Ranbazar वेबविश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’ !
0
SHARES
186
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : सध्या सोशल मीडियावर ‘रानबाजार’ची चर्चा आहे. यामध्ये आघाडीच्या मराठी अभिनेत्री बोल्ड अंदाजात दिसून येणार आहेत. याचे काही टीझर व्हायरल झाले आहेत. मराठी मनोरंजन विश्वात सध्या एका मालिकेची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. ती म्हणजे रानबाजार. दोन दिवसांपूर्वी या मालिकेत महत्वाची भूमिका साकारणाऱ्या दोन अभिनेत्रींचा टीझर व्हायरल झाला होता.’Ranbazar’ Prajakta Mali, who shook the web world ott platform 

यात अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित अत्यंत बोल्ड अंदाजात दिसून येत आहे. ओटीटीवर झळकणाऱ्या ‘रानबाजार’चा ट्रेलर 18 मे रोजी येणार आहे. त्याआधीच या ‘रानबाजार’ अश्लीलता, नग्नतेचा आरोप होत आहे. अभिजित पानसे यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.

‘रेगे’, ‘ठाकरे’ असे ज्वलंत, संवेदनशील विषय हाताळणारे दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. या वेबसिरीजची निर्मिती प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनीने केली असून नुकतेच या वेबसिरीजचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे.

View this post on Instagram

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे. प्लॅनेट मराठी, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत रावण फ्युचर प्रॉडक्शन्स, अभिजित पानसे आणि अनिता पालांडे निर्मित ‘रानबाजार’ ही वेबसिरीज २० मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

 

वेबसिरीजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसे म्हणतात, ” आज सर्वांच्या हातात बघायला ग्लोबल कॉन्टेन्ट आहे तसं पाहिलं तर भाषेचा अडथळा कधीच पार झालाय. त्यामुळे एका सशक्त विषयाची मांडणी उत्तमरीत्या केली तर ती निश्चितच लोकांना आवडेल, सर्वदूर पोचेल असा विश्वास मला आणि अक्षय ला वाटला. आणि मग मराठीतल्या सर्वात सर्वार्थाने मोठ्या अशा ‘रानबाजार’ ची निर्मिती झाली.

 

या वेबसिरीजमध्ये राजकारण आहे, गुन्हेगारी आहे, याशिवाय थरारही आहे. अशा काही गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे, ज्या कदाचित आधी घडून गेल्या आहेत. हा एक वादग्रस्त आणि बोल्ड विषय आहे. अनेक गोष्टी ‘रानबाजार’ पाहिल्यावरच उलगडतील. जाणकारांच्या मते विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आतापर्यंतच्या कॉन्टेन्टमध्ये हा सर्वोत्कृष्ट कन्टेंन्ट असणार आहे.” प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” यापूर्वी मी अभिजित पानसेंचे काम पाहिले आहे.आतापर्यंत त्यांनी जे विषय हाताळले आहेत; त्याला तोड नाही. ज्यावेळी त्यांनी मला ‘रानबाजार’विषयी सांगितले, त्याचवेळी मी या प्रोजेक्टचा भाग होण्याचा निर्णय घेतला.

 

अतिशय थरारक कथानक असलेल्या या वेबसिरीजमध्ये कलाकारही तितक्याच ताकदीचे आहेत. आजपर्यंत ओटीटीवर अशी वेबसिरीज कधीच प्रदर्शित झाली नसेल. इतका दमदार आशय यात पाहायला मिळणार आहे. दहा भागांची ही वेबसिरीज प्रत्येक वेळी एका अशा वळणावर येऊन थांबणार आहे, जिथे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचेल.

 

 

 

Tags: #Ranbazar #PrajaktaMali #shook #webworld #ott #platform#वेबविश्व #हादरवून #टाकणारा #रानबाजार #प्राजक्तामाळी #तेजस्विनीपंडीत
Previous Post

जिल्हा परिषद निवडणुकीत ‘उत्तर’मध्ये कोणाची ताकद दिसणार ?

Next Post

बायकोला साडी नेसता येत नाही म्हणून नवऱ्याची आत्महत्या

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
बायकोला साडी नेसता येत नाही म्हणून नवऱ्याची आत्महत्या

बायकोला साडी नेसता येत नाही म्हणून नवऱ्याची आत्महत्या

वार्ता संग्रह

May 2022
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697