औरंगाबाद : मनासारखी बायको मिळाली नाही, तिला साडी नेसता येत नाही, स्वयंपाक येत नाही, हॉटेलमध्ये जेवायला नेले तर ती जेवणानंतर स्वतःच्या जेवणाची थाळी उचलून दुसरीकडे ठेवते, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करत एका नवविवाहित तरुणाने जीवन संपवले आहे. Husband commits suicide in Aurangabad as wife cannot wear sari
मनासारखी बायको मिळाली नसल्याची मनात अढी निर्माण झाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. अजय साबळे वय-25 (रा. राजनगर, मुकुंदवाडी) असं या तरुणाचं नाव आहे. औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. अजय साबळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे 5 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.
पत्नी माझ्यापेक्षा वयाने 5 वर्षे मोठी आहे. तिला नीट स्वयंपाक येत नाही. चांगली साडी घालता येत नाही. हॉटेलात जेवायला गेल्यावर ती प्लेट उचलून ठेवते, अशी सुसाइड नोट लिहून आय क्विट असे स्टेटस ठेवून 24 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/542578587419875/
अजय प्लंबिंगचे काम करत होता. 5 महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. मनासारखी पत्नी मिळाली नाही, त्यामुळे तो सतत निराश राहायचा. व्हॉट्सअपला सतत निराशजनक स्टेट्स ठेवायचा. मित्रांनी त्याला अनेकदा याबाबत विचारणा केली. मात्र, तो बोलणे टाळायचा. रविवारीही त्याने ‘आय क्विट’ असे व्हॉट्सअप स्टेट्स ठेवले होते. रात्री 9:30 वाजेच्या सुमारास घरावरील पत्र्याच्या खोलीत झोपायला गेला.
त्यानंतर रात्री 12 वाजता त्याचा मित्र त्याला भेटायला आला. अजय वरच्या खोलीत असल्याचे समजल्यावर तो थेट त्या खोलीकडे गेला असता. तर त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर ही माहिती नातेवाइकांना व मुकुंदवाडी पोलिसांना देण्यात आली. अजयने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत बायकोबद्दलच्या तक्रारी केल्या आहेत. आपल्या बायकोला नीट साडी नेसता येत नाही. हॉटेलमध्ये गेल्यानंतर ती स्वत:ची प्लेट स्वत:च उचलून ठेवते असं अजयने चिठ्ठीत म्हटलं आहे. चिठ्ठीतील अक्षर त्याचेच आहे का ? याचा पोलीस तपास करत आहेत.
पोलिस घटनास्थळी आले तेव्हा त्याच्या खोलीत एकपानी सुसाइड नोट आढळून आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/542505710760496/