सोलापूर / बळीराम सर्वगोड
उत्तर सोलापूर तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. तालुक्यातीलल प्रमुख नेत्यांनी यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. उत्तर तालुक्यात माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे आणि भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. Whose strength will be seen in ‘North’ in Zilla Parishad elections? Mane Sathe Pawar
महापालिकेचा अंतिम आराखडा आज मंगळवार, १७ मे रोजी जाहीर होणार आहे. लवकरच जिल्हा परिषदेच्या गटनिहाय कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणजे उत्तर सोलापूर तालुक्यात जि.प.च्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी त्यांचे बंधू इंद्रजीत पवार यांच्या पत्नीला सभापतीपदी बसवले. त्यामुळे इंद्रजित पवार यांची ताकद तालुक्यात वाढल्याचे दिसून आले. त्यांनी इंद्रजीत पवार यांनी पंचायत समिती प्रशासनाकडून तालुक्यात धाक बसविला होता. त्यामुळे तालुक्यातील विकास कामे बऱ्यापैकी मार्गी लागले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/542506570760410/
येत्या जि.प.च्या निवडणुकीत पुन्हा जि.प. गटातून त्यांची उमेदवारी असणार आहे. तालुक्यात सध्या पवार आण काका साठे यांचे प्राबल्य दिसून येते. तर दिलीप माने हेही तालुक्यावर आपली पकड सोडत नाहीत. त्यामुळे पंचायत समितीवर नेमकी कोणाची ? सत्ता येईल शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नाही.
पूर्वीच्या निवडणुकीत दिलीप माने आणि काका साठे एकत्र येत होते. मात्र मागच्या पंचवार्षिक निवडणुकीपासून दोन्ही पवार बंधूही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका तिरंगी होतील अशी तालुक्यातून सध्या जोरात चर्चा सुरू आहे. निवडणुकीला महिनाभराचा कालावधी असल्याचे बोलले जात असून येत्या महिनाभरात मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये वेगळ्याच घडामोडी पाहण्यास मिळणार आहेत.
महाराष्ट्र – सोलापूर, सांगली, सातारासह 9 जिल्ह्यांत पावसाची शक्यता
#rain #rainfall #satara #sangali #rainyday #solapur #possible #सुराज्यडिजिटल #surajyadigital
पुढील चोवीस तासांत मोसमी पाऊस अंदमानात दाखल होईल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांत जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या नऊ जिल्ह्यांना 16 ते 19 में पर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.