Saturday, January 28, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

Final ward announced अंतिम प्रभाग रचना जाहीर : सात प्रभागात अंशतः बदल; अनेक नगरसेवक अडचणीत

Final ward composition announced: partial changes in seven wards; Solapur Municipal Corporation in trouble with many corporators

Surajya Digital by Surajya Digital
May 17, 2022
in Hot News, सोलापूर
0
Final ward  announced अंतिम प्रभाग रचना जाहीर : सात प्रभागात अंशतः बदल; अनेक नगरसेवक अडचणीत
0
SHARES
114
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : महापालिकेची अंतिम प्रभाग रचना आज मंगळवारी सकाळी दहा वाजता प्रसिद्ध झाली आहे.  113 पैकी 7 प्रभागांमध्ये अंशतः बदल झाल्याची माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली.  सीमेरचनेवरच्या आलेल्या तक्रारीवरून हा बदल निवडणूक आयोगाने केल्याचे आयुक्तांनी सांगितले.  Final ward composition announced: partial changes in seven wards; Solapur Municipal Corporation in trouble with many corporators

1 फेब्रुवारी रोजी महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होत.  त्यावेळी अनेकांनी त्यावर हरकती घेतल्या होत्या.  हरकतींची सुनावणी होण्यापूर्वीच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निघाल्यामुळे सर्व प्रक्रिया लांबणीवर पडली.  अखेर न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्याव्यात, असे आदेश दिल्यानंतर पुढील प्रक्रिया चालू करण्यात आली.  त्यानुसार मंगळवारी सकाळी सोलापूर महापालिकेने अंतिम प्रभाग रचना जाहीर केली

प्रभाग क्रमांक 10,  11,  12,  13,  21,  23 आणि 24 मध्ये बदल  झाला आहे. एकूण महापालिकेच्या प्रभाग रचनेवर 117 हरकती आल्या होत्या. त्यापैकी 7 हरकती मान्य करण्यात आल्या आहेत.  प्रभाग रचना निवडणूक आयोगाच्या आदेशाने केली आहे.  कोणत्याही पक्षाचा अथवा नेत्याचा दबाव आपल्यावर नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ईव्हीएम मशीनचे चेकिंग काम सुरू आहे.  मतदार याद्यांचे कामही महापालिकेने हाती घेतले आहे.  निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.

अनुसूचित जातीसाठी प्रभाग 1,5,7,8, 9,10, 21,22,23,24,26,27,28,33,36 व 38 आणि अनुसूचित जमाती साठी प्रभाग 24 व 35 साठी राखीव करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त पि. शिवशंकर यांनी दिली.

 

□ जुन्या सर्वच नगरसेवकांचे प्रभाग नंबर बदलले    

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जाहीर झालेल्या प्रभागरचनेचा विचार करता नुकतेच महापालिकेत नगरसेवक असलेले काही माजी नगरसेवक अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यातील सत्तेचा वापर करून प्रभागरचनेत अडचणी आणल्याचे दावे – प्रतिदावे केले जात आहेत. नव्या प्रभागरचनेत सर्वच माजी नगरसेवकांचे प्रभाग नंबर मात्र बदलले आहेत.

महापालिकेच्या अंतिम प्रभागरचनेत प्रभाग क्रमांक 10, 11, 12, 13, 21, 23, 24 अशा सात प्रभागांमध्ये बदल झालेले आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

》 झालेले बदल पुढील प्रमाणे –

प्रभाग 10 मधील निराळे वस्तीचा भाग आता प्रभाग 11 मध्ये जोडण्यात आला आहे. प्रभाग 11 मधील सुपर मार्केट, जुनी मिलचाळ हा भाग आता प्रभाग 12 मध्ये जोडण्यात आला आहे. प्रभाग 12 मधील कोनापुरे चाळ पूर्ण आता प्रभाग 21 मध्ये जोडण्यात आला आहे. प्रभाग 13 मधील डफरिन चौक, मुलींचे आयटीआय हा भाग आता प्रभाग प्रभाग 12 ला जोडण्यात आला आहे. प्रभाग 24 मध्ये सलगरवस्तीचा भाग समाविष्ठ करण्यात आला आहे.

बदल झालेल्या प्रभागांपैकी प्रभाग 10 मध्ये अनेक दिग्गज राजकीय व्यक्ती महापालिकेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असणार आहेत. प्रभाग 10 मधून निराळे वस्ती वगळून प्रभाग 11 मध्ये समाविष्ट केल्याने मोठा फरक पडणार आहे. प्रभाग 10 आणि 11 मधून शिवसेना, राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज मैदानात असण्याची शक्यता आहे. इथे दिग्गज इच्छुक ऐकमेकांसमोर लढणार नाहीत, अशी दक्षता घेतल्याचे जाणवते.

प्रभाग 11 मधून सुपर मार्केट व जुनी मील चाळ वगळून प्रभाग 12 मध्ये समाविष्ट करण्यात आल्याने काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांसाठी हा प्रभाग सोयीचा झाल्याची चर्चा आहे. प्रभाग 12 मधील कोनापुरे चाळ परिसर आता प्रभाग 21 मध्ये समाविष्ट केल्याने काँग्रेसपासून दुरावलेल्या येथील इच्छुकांना आता कसरत करावी लागणार आहे.

प्रभाग 13 ला डफरिन चौक, मुलींचे आयटीआय हा परिसर नव्याने जोडला आहे. तर याच प्रभागात जिल्हाधिकारी कार्यालयाचाही परिसर जोडण्यात आला आहे. प्रभाग 13 आणि 14 हे दोन्ही राष्ट्रवादीला पोषक ठरतील असे केल्याची चर्चा आहे. कारण इथे दिग्गज इच्छुक ऐकमेकांसमोर येणार नाहीत, याची दक्षता घेतल्याचे दिसते आहे.

प्रभाग 24 ला सलगरवस्तीचा पूर्ण भाग जोडला आहे. प्रभाग 23 ला काही नवीन भाग आल्यामुळे काही इच्छुक विद्यमानांची अडचण होण्याची शक्यता आहे.

प्रभाग 38 हा दोन सदस्यीय असणार आहे. प्रतापनगर, कुमठे गावठाण, सोरेगाव गावठाण, सिध्देश्‍वर साखर कारखाना, शिवशाही कारखाना असा परिसर या प्रभागात आहे. प्रभागातील दोन जागांपैकी एक जागा एससी प्रवर्गासाठी राखीव आहे.

● प्रशासन यंत्रणा सज्ज

महापालिकेची निवडणूक दोन टप्प्यात झाल्यास सोलापूर महापालिकेची निवडणूक पहिल्या टप्प्यात होण्याची शक्यता दाट आहे. आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोग जशा सूचना देईल, त्यानुसार मनपा प्रशासनाची यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासन प्रमुखांनी सांगितले आहे.

प्रारुप मतदार यादीही तयार करण्याचे मनपाचे काम सुरु आहे. निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला तरी बाकीची संबंधित कामे समांतर सुरुच राहतील, असेही सांगण्यात आले.

 

 

Tags: #Finalward #composition #announced #partial #changes #sevenwards #Solapur #Municipal #Corporation #trouble #corporators#सोलापूर #महापालिका #अंतिम #प्रभाग #रचना #जाहीर #सातप्रभाग #अंशतः #बदल #नगरसेवक #अडचणीत
Previous Post

Kho Kho Competition राज्य निमंत्रित खो खो स्पर्धा : सांगली, पुणे, ठाणे व मुंबई उपनगर उपांत्य फेरीत

Next Post

सोलापुरात पिण्याच्या पाण्यावरून मारहाण; चावा घेतल्याने दोन बोटे तुटली

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोलापुरात पिण्याच्या पाण्यावरून मारहाण; चावा घेतल्याने दोन बोटे तुटली

सोलापुरात पिण्याच्या पाण्यावरून मारहाण; चावा घेतल्याने दोन बोटे तुटली

वार्ता संग्रह

May 2022
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697