Monday, February 6, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सोलापुरात पिण्याच्या पाण्यावरून मारहाण; चावा घेतल्याने दोन बोटे तुटली

वैरागमध्ये कपड्याचे दुकान आगीत जळून खाक 

Surajya Digital by Surajya Digital
May 18, 2022
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
सोलापुरात पिण्याच्या पाण्यावरून मारहाण; चावा घेतल्याने दोन बोटे तुटली
0
SHARES
105
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – नळावरील पाण्याच्या भांडणातून मारहाण करून दाताने चावा घेतल्याने उजव्या हाताची दोन बोटे मोडून इसम जखमी झाला. ही घटना अक्कलकोट रोडवरील पडगाजी नगर येथे सोमवारी (ता. 16) रात्रीच्या सुमारास घडली. Beating over drinking water in Solapur; Two fingers were broken after taking a biteI Vairag, a clothes shop was set on fire 

हरिदास विष्णू कदम (वय ४५ रा. पडगाजीनगर, अक्कलकोट) असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. त्यांना गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्रीच्या सुमारास  नळाला पाणी सुटले होते. त्यावेळी कदम यांच्या घरा शेजारी राहणारा राजू उर्फ आनंद राऊत ) याने नळाचे पाणी इतरत्र सांडत होता.

त्यावेळी हरिदास कदम यांनी विचारणा केली असता त्यांनी राजू राऊत त्याची आई, वडील आणि बायको यांनी  कदम यांना मारहाण केली. यावेळी राजू उर्फ आनंद राऊत याने चावा घेतल्याने हरिदास कदम यांच्या उजव्या हाताची दोन बोटे मोडून ते गंभीर जखमी झाले. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली आहे.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

□ वैरागमध्ये कपड्याचे दुकान आगीत जळून खाक 

बार्शी : तालुक्यातील वैराग येथील सतीश कलेक्शनच्या दुकानाला आग लागून सुमारे सव्वा सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी (ता. 17) मध्यरात्री घडली असून याबाबत वैराग पोलिस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली. जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक हानी झाली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, वैराग मधील गांधी चौकामध्ये सतीश कलेक्शन अँड ट्रेडर्स नावाचे कपड्याचे मोठे दुकान आहे. या दुकानात मंगळवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास  आग लागली. यामध्ये दोन लाख रुपये किमतीच्या नवीन कपड्यांच्या चार गाठी, तीस हजार रुपये किमतीचे 30 शिवलेले ड्रेस, पावणेदोन लाख रुपये किमतीच्या सात जुकी कंपनीच्या शिलाई मशीन, सव्वा लाख रुपये किमतीच्या पाच मोहील कंपनीच्या शिलाई मशीन, तीस हजार रुपये किमतीचा एक, जनरेटर दहा हजार रुपये किमतीचे छोटे जनरेटर, पन्नास हजार रुपये किमतीचे दुकानातील फर्निचर आणि काऊंटर असा एकत्रित सुमारे सहा लाख 20 हजार रुपये किमतीचा दुकानातील माल आणि साहित्य जळून खाक झाले आहे.

याबाबतची खबर  संदीप सतीश मस्के यांनी दिल्यानंतर  वैराग पोलिस स्टेशनमध्ये नोंद  करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सदाशिव गवळी करत आहेत.

 

Tags: #Beating #drinking #water #Solapur #Two #fingers #broken #biteI #Vairag #clothes #shop #set #fire#सोलापूर #पिण्याच्या #पाणी #मारहाण #चावा #दोन #बोटे #तुटली #वैराग #कपडे #दुकान #जळून #खाक
Previous Post

Final ward announced अंतिम प्रभाग रचना जाहीर : सात प्रभागात अंशतः बदल; अनेक नगरसेवक अडचणीत

Next Post

काँग्रेसला मोठा झटका, हार्दिक पटेलचा राजीनामा

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
काँग्रेसला मोठा झटका, हार्दिक पटेलचा राजीनामा

काँग्रेसला मोठा झटका, हार्दिक पटेलचा राजीनामा

वार्ता संग्रह

May 2022
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697