Saturday, January 28, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

Attempted murder अकलूजमध्ये जुन्या भांडणाच्या वादातून कुऱ्हाडीने वार करून खुनाचा प्रयत्न

Attempted murder in Akluj over an old feud

Surajya Digital by Surajya Digital
May 19, 2022
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
Attempted murder अकलूजमध्ये जुन्या भांडणाच्या वादातून कुऱ्हाडीने वार करून खुनाचा प्रयत्न
0
SHARES
108
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज : जुन्या भांडणाचा राग डोक्यात धरून जिवे मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने वार केल्याची घटना अकलूज पोलिस स्टेशन समोरच घडल्याने एकच खळबळ उडाली. यात अकलूज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.  यात खुनाचा प्रयत्न म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. Attempted murder in Akluj over an old feud

वार करून आरोपी पोलिस स्टेशनमध्येच घुसल्याने त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. वार झालेल्याला जखमी अवस्थेत दवाखान्यात दाखल करण्यात आले. याबाबत अकलूज पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार , अकलूज येथील फिर्यादी निखिल नागनाथ शिरसट (वय 26 रा . व्यंकटनगर- अकलूज ता . माळशिरस) याचे व आरोपी हिरा खंडागळे (रा . अकलूज) यांच्यात जुने भांडण होते. त्या भांडणातून हिरा खंडागळे याने निखील शिरसट याच्यावर केस केली होती. या दोघांमध्ये केस माघे घेण्यासंदर्भात बाचाबाची झाली होती.

मंगळवारी ( दि. 17 मे) निखिल शिरसट रात्री साडेदहाच्या सुमारास त्याच्या दुसऱ्या मित्राचे भांडण सोडवण्यासाठी अकलूज पोलिस स्टेशनला आला होता.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

दरम्यान त्याचवेळी निखिल शिरसट याला मारण्याच्या उद्देशाने दोन तासाहून अधिक काळ दबा धरून बसलेल्या हिरा खंडागळे याने मिळालेल्या संधीचा फायदा घेत अकलूज पोलिस स्टेशनच्या गेट समोर ‘ तू लई मस्तीला आलाय का माझा नाद करू नको मी केस मागे घेत नाही ‘ वैगरे म्हणत तूला खलास करतो, असे म्हणत निखील शिरसट याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला.

तो वार पाठीमागे मानेवर बसला. कुऱ्हाडीचा वार जबरी बसल्याने रक्ताच्या थारोळ्यात भिजलेल्या निखिल शिरसट याने लागलीच घाबरून आरडा – ओरडा केला . त्यामुळे दुसरा वार करण्यासाठी हिरा खंडागळे पाठीमागे पळत आला असतानाच तेथील शिरसटचे सहकारी व पोलीस यांच्या मदतीने खंडागळे यास कुऱ्हाडीसह ताब्यात घेतले. यावेळी शिरसट यास मार लागल्याने तात्काळ राणे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

 

गुन्ह्यातील अरोपी हत्यारासह जेरबंद करून जखमी फिर्यादीच्या जबाबावरून गुन्ह्यातील संशयित ईतर अरोपी व खूनाचा कट रचणारे अरोपी यांचा तपास पोलीस निरीक्षक अरूण सूगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोसई जगताप करीत आहेत. आरोपी विरोधात पोलीस ठाणे अकलूज येथे गुरनं 357/2022 भादवि 307 व 120 ब व सहकलम 143 ते 147 ते 149 प्रमाणे 504 , 506 कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

Tags: #Attempted #murder #Akluj #old #feud #solapur #crime#अकलूज #जुन्या #भांडण #वाद #कुऱ्हाडी #वार #खुन #प्रयत्न
Previous Post

Navjot Singh Sidhu पार्किंगवरून भांडण : नवज्योत सिंग सिद्धू यांना जेल, सुप्रीम कोर्टाचा निकाल

Next Post

Teacher salary एक तारखेला होणार शिक्षकाचा पगार : एक बटन दाबले अन शिक्षकांचा 94 कोटी पगार झाला जमा

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
Teacher  salary एक तारखेला होणार शिक्षकाचा पगार : एक बटन दाबले अन शिक्षकांचा 94 कोटी पगार झाला जमा

Teacher salary एक तारखेला होणार शिक्षकाचा पगार : एक बटन दाबले अन शिक्षकांचा 94 कोटी पगार झाला जमा

वार्ता संग्रह

May 2022
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697