□ प्राथमिक शिक्षकांना सीएमपी प्रणाली द्वारे पगार जमा
□ जिल्ह्यातील ९ हजार ४३३ समावेश
सोलापूर : जिल्ह्यातील ९ हजार ४३३ प्राथमिक शिक्षकांना सीएमपी प्रणाली द्वारे 94 कोटी पगार एक बटन दाबल्यावर जमा झाला आहे. राज्यात शिक्षकांना वेळेत पगार देणारी सोलापूर जिल्हा परिषद अग्रणी असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. On one day, the salary of a teacher will be paid at the push of a button and the salary of a teacher will be Rs 94 crore
जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात आज सीएनपी प्रणाली द्वारे प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख अशा एकूण 9 हजार 433 जणांचा पगार सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते एका क्लिक वर जमा करण्यात आला. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील,उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, शिक्षणाधिकारी डाॅ. किरण लोहार, लेखाधिकारी रामचंद्र पाटील, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी प्रमुख उपस्थित होते.
प्रशासकीय व तांत्रिक त्रुटी दूर करून दरमहा १ तारखेला शिक्षक व केंद्र प्रमुख यांचे वेतन थेट जिल्हा स्तरावरून त्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा होण्यासाठी अर्थ विभागाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार व चंद्रकांत सुर्वे व त्यांचे टीमने मेहनत घेतली.
महिन्द्रा कोटक बॅंकेची मदत घेऊन कमी कालावधीत युध्द पातळींवर हे काम पूर्ण केले. त्या बद्दल सिईओ दिलीप स्वामी यांनी टीम चे अभिनंदन केले. या प्रसंगी शिक्षक संघटनेचे वतीने सिईओ दिलीप स्वामी यांचा ही प्रणाली राबविण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रणाली राबविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल सिईओ दिलीप स्वामी यांच्या हस्ते उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, लेखाधिकारी रामचंद्र पाटील, महिन्द्रा कोटक बॅंकेचे शाखा व्यवस्थापक ओंकार देवळे , सहाय्यक लेखाधिकारी योगेश कटकधोंड, विलास मसलकर, दिपक शेडे, यांचा सत्कार करण्यात आला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/544013300609737/
शिक्षक संघटनेचे सुरेश पवार यांनी मनोगत व्यक्त केले. क्रांतीकारी निर्णय सिईओ दिलीप स्वामी यांनी घेतल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले. शिक्षक संघटनेचे म. ज. मोरे, एकनाथ भालेराव, राम इंगळे, महादेव जठार, विठ्ठलसिंग तोवर, शहानवाज मुल्ला, विवेक लिंगराज, सुरेश पवार यांनी सिईओ दिलीप स्वामी यांचे स्वागत केले.
□ असा होणार पगार जमा
गटशिक्षणाधिकारी मुख्याध्यापक यांच्याकडून आलेल्या वेतन देयकांचा पडताळणी करतील. गैरशासकीय कपाती वेगळे करतील. एकत्रित संकलित देयक जिल्हा स्तरावर पाठवतील. तालुका निहाय बॅंक खाते यादी व वेतन तरतूद मागणी व प्रमाणपत्र कपात विवरण पाठवतील. दर महिन्याचे २० तारखेला अहवाल व संचिका शिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीने तयार करतील.
२५ तारखे पर्यंत अर्थ विभागाकडे पाठवून त्याची पडताळणी करून दर महिन्याचे एक तारखेला निव्वळ पगार शिक्षकांचे खात्यावर जमा होईल. कपात रक्कम गटविकास अधिकारी यांच्या खात्यावर सीएनपी प्रणाली द्वारे जमा होईल. सिईओ दिलीप स्वामी यांच्या पाठपुराव्यामुळे पगार वेळेत देणे शक्य झाले आहे. मी २० वर्षे शिक्षक होतो माझा पगार १ तारखेला मिळाला नाही मात्र इतरांचा पगार १ तारखेला करता येत आहे याचा आनंद होत असल्याचे शिक्षणाधिकारी डाॅ. किरण लोहार यांनी सांगितले.
□ सीएनपीमुळे सर्व तांत्रिक त्रुटी दूर
सीएनपी प्रणालीमुळे सर्व तांत्रिक त्रुटी दूर झाले आहेत. या पुढे शिक्षकांना पगारीसाठी वाट पहावी लागणार नाही. सिईओ दिलीप स्वामी यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे. टीम गेल्या एक महिन्यापासून या वर काम करत आहे. कोटक महिन्द्रा बॅंकेचे चांगले योगदान मिळाल्याचे मत उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/543935250617542/