मुंबई : राज्यात अनेक शहरात सूर्य तळपला आहे. काही शहरात 45 ते 46 अंशांपर्यंत तापमान गेले. 11 ते 21 मेदरम्यान मात्र राज्यात सहा जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा फारच तापला. In Maharashtra, 6 people died of heatstroke in 11 days
बहुतांश शहरात 40 च्या वर तर काही भागात 45 ते 46 अंशांपर्यंत तापमान गेले. पण उन्हासोबत वाऱ्याचा वेग अपेक्षित वाढलेला नसल्याने 10 मेपर्यंत राज्यात उष्माघाताने बळीची एकही अधिकृत नोंद नव्हती. मात्र त्यानंतर 11 ते 21 मेदरम्यान मात्र राज्यात सहा उष्माघाताने मृत्यूची नोंद झाली. 10 मे 2022 पर्यंत राज्यात 25 उष्माघात संशयितांचा मृत्यू झाला होता.
त्यात जळगाव 4, नागपूर 11, जालना 2, अकोला 3, अमरावती, औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद, परभणीमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद आहे. या 25 पैकी 6 मृत्यू हे उष्माघाताचे बळी असल्याचे आरोग्य विभागाने सांगितलं. जालना, उस्मानाबाद, अकोला, जळगावचे प्रत्येकी 1 तर नागपूरच्या 2 जणांचा त्यात समावेश आहे.
राज्यात काही भागात अवकाळी पाऊस होत असला तरी उष्णतेचे प्रमाण मात्र वाढत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि नाशिक जिल्ह्यात उष्णतेची दाहकता जाणवते. उष्णता वाढल्याने उष्माघाताने होणारे मृत्यूही वाढले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/546124343731966/
राज्यात उष्णता वाढल्याने १० मेपर्यंत ५४३ मग आताचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये विविध जिल्ह्यातील २९ संशयितांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. पैकी ५ जळगाव, १२ नागपूर, ३ जालना, ३ अकोला, २ अमरावती, १ औरंगाबाद, १ हिंगोली, १ उस्मानाबाद, १ परभणी जिल्ह्यात मृत्यू झाले आहेत. सहा जणांच्या मृत्यूचा अहवाल आला असून ते उष्माघाताचे बळी ठरले आहेत. उर्वरित मृत्यू उष्माघात संशयित आहेत. त्यांच्या मृत्यूचा अहवाल आल्यानंतर त्याबाबत स्पष्टीकरण दिले जाईल, असे राज्याच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
डिहायड्रेशन आणि मधुमेह एकत्र दिसून येतात. मधुमेह असणाऱ्या लोकांना डिहायड्रेशनचा जास्त त्रास होण्याची शक्यता असते. शरीरामध्ये पुरेसे इन्सुलिन तयार होत नसल्यामुळे रक्तात साखर तयार होते. आणि या साखरेला शोषून घेण्यासाठी तुमचे मूत्रपिंड जास्त काम करत असतील तेव्हा मधुमेह होतो. जर तुमची मुत्रपिंड अधिक प्रमाणात काम करत असतील तर शरीर रक्तातील अतिरिक्त साखर मूत्र विसर्जनाद्वारे घालवते ज्याकरिता तुमच्या टिश्यूकडून द्रव घेतले जाते.
खरंतर डिहायड्रेशन हा सर्वांच्याच काळजीचा मुद्दा आहे. परंतु, मधुमेह असणाऱ्यांनी मात्र याकडे नक्कीच गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. मधुमेह आणि डिहायड्रेशन त्यांच्या एकत्रीकरणामुळे आरोग्याच्या बाबतीत अनेक प्रकारची गुंतागुंत निर्माण होऊ शकते. यासाठी काही साधे उपाय करून पाहिल्यास नक्कीच यावर नियंत्रण ठेवता येते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/546370867040647/