मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढल्या महिन्यात (14 जून) महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार आहे. आचार्य तुषार भोसले यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच मोदींना यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी देहू संस्थानाच्या विश्वस्तांसह भोसले यांनी मोदी यांची भेट घेतली होती. Prime Minister to visit Maharashtra on June 14; Dedication of Shila Temple of Tukoba Dehu Pune
पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान मोदी याआधी 6 मार्चला पुण्यात मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आले होते. काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानाच्या विश्वस्तांसह आचार्य तुषार भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते.पंतप्रधान मोदी यांनी हे आमंत्रण स्वीकारले असून 14 जूनला पंतप्रधान देहूत येणार आहेत. आचार्य तुषार भोसले यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
ऐन वारीच्या तोंडावर पंतप्रधानांचा हा दौरा महत्त्वाचा असेल. राज्यात आगामी काळात होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही या दौऱ्याला महत्त्व असणार आहे. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी थेट पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचतील.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पंतप्रधान मोदी 14 जूनला देहूत येणार आहेत, आणि यंदाचा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 20 जूनपासून सुरु होईल. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संक्रमणामुळे होऊ न शकलेला वारीचा सोहळा यावर्षी मोठ्या उत्साहात होणार आहे. त्याआधीच पंतप्रधान देहूत येत असल्याने या दौऱ्याचे विशेष महत्त्व असणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, उद्या (24 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी क्वाड समिटमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. जपानमध्ये क्वाड नेत्यांची दुसरी शिखर परिषद होत आहे. या परिषदेत चारही देशांच्या नेत्यांकडून विकासाच्या दृष्टीने महत्वाची पावले उचलली जातील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. क्वाड अंतर्गत सुरु असलेल्या विविध उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्याची ही उत्तम संधी असल्याचे मोदी म्हणाले.
ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान अथनी अल्बानीस देखील पहिल्यांदाच क्वाड संमेलनात सहभागी होणार आहेत. त्यांच्याही सोबत द्वीपक्षीय बैठक करण्यास मी उत्सुक असून, सर्वसमावेशक राजनैतिक भागीदारी अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुआयामी सहकार्य, तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक विषयांवर त्यांच्यासोबत या बैठकीत व्यापक चर्चा होऊ शकते.