सोलापूर – ड्रायव्हरने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे शेजारी बसलेला क्लिनर खाली कोसळून ट्रकच्या चाकाखाली चेंगरून जागीच ठार झाला. हा अपघात पुणे महामार्गावरील वरवडे (ता.माढा) येथे सोमवारी (ता. 23) पहाटेच्या सुमारास घडला. Hitting the brakes, knocking the truck down and killing the cleaner; Five injured in hotgi overturning in Solapur
धोंडीबा विश्वनाथ मलाले (वय २५ रा. बसवकल्याण जि.बिदर) असे मयत झालेल्या क्लीनरचे नाव आहे. या प्रकरणात ट्रकचा चालक महादेव जयप्रकाश ठमके (रा.बसवकल्याण) याच्याविरुद्ध टेंभुर्णीच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हे दोघेजण ट्रक मधून प्रवास करीत होते.
वरवडे गावाजवळ ड्रायव्हरने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे धोंडीबा मलाले खाली कोसळला. ट्रक तसाच पुढे गेल्याने तो चाकाखाली सापडून मयत झाला. अशी नोंद टेंभुर्णी पोलिसात झाली. सहाय्यक फौजदार गुटाळ पुढील तपास हे करीत आहेत.
□ होटगी जवळ टमटम उलटून चालकासह ५ प्रवासी जखमी
सोलापूर – होटगी रोडवरील साईबाबा मंदिराजवळ वेगाने जाणारी रिक्षा उलटल्याने चालकासह ५ प्रवासी जखमी झाले. हा अपघात आज मंगळवारी (ता. 24) सकाळच्या सुमारास घडला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/547348206942913/
सरोजा बळगानुरे (वय १८) रेणुका सोलापुरे (वय १९) अर्चना पांडुरंग (सर्व रा.यत्नाळ ता.दक्षिण सोलापूर) सुहाब जमखंडी (वय २४ रा.कुंभारी घरकुल) आणि रिक्षाचा चालक सुरेश कोळी (वय ५० रा.होटगी रोड) असे ५ जण जखमी झाले. ते सर्वजण आज सकाळी एमएच१३-जी-४८६५ या सहा आसनी रिक्षातून हत्तुरेवस्ती ते होटगी असा प्रवास करीत होते. त्यावेळी हा अपघात घडला. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
□ बसमध्ये चढताना सोन्याचे गंठण लंपास
सोलापूर : बसमध्ये चढत असताना पर्समधून सोन्याचे मिनी गंठण चोरून नेल्याची घटना काल सोमवारी (दि.२३ मे ) सोलापूर बस स्थानकामध्ये घडली. याप्रकरणी सरोजा शरणाप्पा बिराजदार (वय-५० रा. मुक्काम पोस्ट मुळेगाव,तालुका दक्षिण सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी व फिर्यादीचे पती असे दोघे मिळून उमरगा ठाणे या बसमध्ये चढत होते. त्यावेळी त्यांच्याजवळ असलेल्या पर्समधून २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक पोळ हे करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/547230863621314/