सोलापूर : मित्र नगर शेळगी परिसरात राहणारे दिपक गंगाधर पवार (वय अंदाजे ३६) या सिक्युरिटी गार्डने अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी (ता. 24) दूपारच्या सुमारास समोर आली. Shelgit security guard commits suicide; Solapur criminals commit fraud of Rs 29 lakh by Baap-Leka in Pune
प्राथमिक माहिती अशी की, दीपक गंगाधर पवार याने आपल्या राहत्या घरात मित्र नगर शेळगी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. आजूबाजूच्या परिसरामध्ये वास येत असल्यामुळे ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. मयत दिपकचा मृतदेह शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
ही घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. मयत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत होता. दोन वर्षांपूर्वी त्याची पत्नी पटत नसल्याने माहेरी गेली होती. त्यामुळे तो घरात एकटाच राहत होता. आज सकाळी घरातून दुर्गंधी येत असल्याने याची माहिती आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना कळवली.
त्याप्रमाणे पोलिसांनी टपरीवजा घराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. तेंव्हा त्याचा मृतदेह छताच्या लाकडी वाशाला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने दोन दिवसापूर्वी हा प्रकार केला असावा असा अंदाज पोलिसांचा आहे. या घटनेची नोंद जोडभावीपेठ पोलिसात झाली. हवालदार माने पुढील तपास करीत आहेत .
□ बाप-लेकाने केली बांधकाम व्यावसायिकाची २९ लाखाची फसवणूक
सोलापूर : बाप – लेकाने मिळून एका बांधकाम व्यावसायिकाची २९ लाख ८३ हजार ८७७ रुपये इतकी रक्कम घेऊन परत न देता फसवणूक केल्याची घटना घडली.
याप्रकरणी सुरेंद्र चक्रपाणी चिलका (वय-५४,रा.फ्लॅट नंबर ५,चौथा मजला,लीला आर्केड, रेल्वे लाइन्स, सोलापूर) यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून राहुल राजकुमार रेड्डी आणि राजकुमार रेड्डी (दोघे रा.साई कॉम्प्लेक्स, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/547360070275060/
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा चुलत भाऊ प्रशांत चिल्का यांचा मित्र राहुल रेड्डी यांची व फिर्यादी यांची बांधकाम व्यवसायामुळे मागील दहा वर्षापासून ओळख होती. वरील संशयित आरोपी यांनी एच.एस.आर साईट धुळे सोलापूर या पाण्याच्या टाकीचे काम इंडियन ह्यूमन पाईप कंपनी लिमिटेड यांच्याकडून घेऊन त्यात फिर्यादी यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
त्यावेळी फिर्यादी सुरेंद्र चिलका यांच्याकडून वेळोवेळी चेक व रोख रक्कम असे एकूण २९ लाख ८३ हजार ७७७ रुपये इतकी रक्कम आशिष चिलका व प्रमोद पुकाळे यांच्या समक्ष फिर्यादीच्या राहत्या घरातून घेऊन गेले. त्यानंतर फिर्यादीकडून घेतलेले रक्कम फिर्यादी यांना परत न करता सोलापूर जनता सहकारी बँक लि.येथील बँकेतील खाते बंद असलेल्या बँकेचे खोटे चेक दिला. फिर्यादीस मानसिक त्रास देऊन विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली. पुढील तपास पोसई गायकवाड हे करीत आहेत.
□ चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा छळ; पतीसह सात जणांवर गुन्हा
सोलापूर : चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सात जणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.
याप्रकरणी ज्योती विशाल गायकवाड (वय-२०, मड्डी वस्ती,भवानी पेठ,सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरुन पती विशाल किसन गायकवाड, सासू वंदना किसन गायकवाड, सासरे किसन पांडुरंग गायकवाड, ननंद आरती आनंद माने, पूजा गजानन खरात, पल्लवी किसन गायकवाड, नंदवा गजानन खरात (सर्व राहणार-जुने बस स्टँड समोर,भाजी मार्केट जवळ, आंबेडकर नगर,अकलूज, ता. माळशिरस) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी ज्योती गायकवाड या सासरी राहण्यास असताना सासरकडील मंडळींनी पंधरा दिवस त्यांना व्यवस्थित नांदविले. त्यानंतर ज्योती यांना शारीरिक व मानसिक छळ करून त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन जाचहाट केली. ५० हजार रूपये माहेरहून घेऊन ये असे म्हणून फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दमदाटी करून माहेरी हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस नाईक माने हे करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/547348206942913/