सोलापूर – शहर पोलीस दलातील 365 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी दिले आहेत. विविध पालिस ठाण्यामधील तसेच शाखांमधील सुमारे ५० कर्मचाऱ्यांना मुख्यालयात पाठविण्यात आले. शहर गुन्हे शाखेतील २२ कर्मचाऱ्यांची बदली इतरत्र करण्यात आलीय. 365 internal police transfers; 50 transferred to headquarters crime branch
पोलीस शिपाई ते सहायक फौजदार दर्जाचा कालावधी पूर्ण केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या शहरांतर्गत बदल्या मंगळवारी (ता.24) करण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहायक फौजदार आदींचा समावेश आहे. शहरातील सात पोलीस ठाणे व विविध शाखेच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये ३१८ व ४७ पोलीस कर्मचारी अशा दोन भागात एकूण ३६५ जणांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये एकाच ठिकाणी कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, पसंतीक्रम यांचा विचार करून पोलीस आयुक्तालय आस्थापना मंडळाने या प्रशासकीय बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/547679886909745/
आयुक्तालयात एकाच ठिकाणी कालावधी पूर्ण केलेल्या सहायक फौजदार, पोलिस हवालदार, पोलिस नाईक व पोलिस शिपाई या पदाच्या ३१८ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. फौजदार चावडी पोलिस ठाणे, जेलरोड पोलिस ठाणे, सदर बझार पोलिस ठाणे, विजापूर नाका पोलिस ठाणे, सलगर वस्ती पोलिस ठाणे, जोडभावी पेठ पोलिस ठाणे, एमआयडीसी पोलिस ठाणे, गुन्हे शाखा, विशेष शाखा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा, शहर वाहतूक शाखा, दहशतवाद विरोधी कक्ष, नियत्रंण कक्ष, दंगा नियत्रंण पथक, सायबर सेल, पोलिस मुख्यालय, सुरक्षा शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, महिला सुरक्षा विभाग, नागरी सुविधा केंद्र, मोटार परिवहन विभाग, जलद प्रतिसाद पथक आदी विभागांमधील कर्मचाऱ्यांचा बदल्यांमध्ये समावेश आहे.
एकाच ठिकाणचा कालावधी पूर्ण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. काही कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केले आहेत. त्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या अद्याप झालेल्या नाहीत. तसेच आयुक्तालयातील पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक या पदाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे.
□ गुन्हे शाखेच्या पीआयपदी कोणाची वर्णी ?
गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय साळुंखे हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मात्र या गुन्हे शाखेत कोणत्या अधिकाऱ्याची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आयुक्तालयातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. हे सर्व अधिकारी बदलीच्या प्रतिक्षेत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/547783580232709/