□ कर्मचाऱ्यांनीच लावला चुना, कंपनीने दाखल दाखल केला गुन्हा
सोलापूर : सोलापूर शहरातील एल अँड टी फायनान्स कंपनीच्या बनावट कर्जाचे प्रकरण पुढे आले आहे. ३६ युवकांच्या कागदपत्रांचा वापर करून कंपनीतील कर्मचाऱ्यांनी ४५ लाखांच्या गाड्या खरेदी करून घोटाळा केल्याचे चव्हाट्यावर आले. उडवाउडवीची उत्तरे मिळताच संतप्त होऊन कंपनीला टाळे ठोकले. हे प्रकरण कसे उजेडात आले वाचा सविस्तर…36 scams worth Rs 45 lakh in L&T company in Solapur; Avoid knocking company
या प्रकरणात माजी विरोधीपक्ष नेते अमोल शिंदे यांनी फसवणूक झालेल्या एका तरुणाला सोबत घेऊन फायनान्स कंपनीच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने शिंदे यांनी चक्क कार्यालयास टाळे ठोकले.
सात रस्ता परिसरात गरुड बंगला येथे एल अँड टी फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. तिथे एक कर्मचारी, एक एजंट आणि अन्य दोन बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली. त्याच्या माध्यमातून बनावट कर्ज प्रकरण करत ४५ लाखांची वाहने खरेदी केली. याबाबत आतापर्यंत ३७ युवकांनी कंपनीकडे तक्रार केली आहे. बिंग फुटू नये म्हणून आरोपींनी स्वतः काही महिने हफ्तेसुध्दा भरले.
मात्र नंतर यांची एकेक प्रकरणे बाहेर येऊ लागल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वर्षभरापूर्वी जुना विडी घरकुल येथील किरण कोंडा, जुनी मिल कंपाऊंड येथील मोहम्मद ख्वाजा पाशा, मोहम्मद गुन्हा दाखल केला. कंपनीचे यनगंटी यांनी या प्रकरणी कासिम मुल्ला या दोघांविरुद्ध सदर बझार पोलिसात फसवणुकीचा एरिया सेल्स मॅनेजर तुकाराम फिर्याद दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ असे फुटले बिंग
पंढरपूर तालुक्यातील खरसोळी येथील शिवाजी बाबर या युवकाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून १० लाखांचे कर्ज मंजूर झाले आहे. परंतु त्याचे सिबिल रेकॉर्ड खराब असल्यामुळे मंजूर झालेले कर्ज देता येत नाही, असे बँकेकडून त्याला सांगण्यात आले.
आपण यापूर्वी कर्ज घेतले नाही तर सिबिल खराब कसे? अशी विचारणा करताच एल अँड टी कंपनीमध्ये सन २०२० मध्ये दीड लाख रुपयांचे कर्ज प्रकरण केल्याचे प्रकरण समोर आले. बाबर यांनी थेट एल अँड टी कंपनीच्या कार्यालयात या प्रकरणाची चौकशी केली असता त्यांच्या नावावर कर्जाची थकबाकी असल्याचे निदर्शनास आले. आपण कर्ज घेतले नाही.
कोणतीही कागदपत्रे दिली नाहीत तर माझ्या नावावर कर्ज कोठून आले? असा सवाल बाबर यांनी विचाराला असता एल अँड टी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बनावट कर्ज प्रकरणाचा इतिहास सांगितला आणि या प्रकरणातून बाहेर पडायचे असेल तर थकबाकीची पूर्ण रक्कम भरा, त्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा सल्ला दिला.
□ कार्यालयास ठोकले टाळे
वैतागलेल्या बाबर यांनी माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे आणि सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांची भेट घेऊन घडला प्रकार सांगितला. शिंदे, पवार यांनी तातडीने या दोघांनी कंपनीचे कार्यालय गाठले. अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि बाबर यांना या प्रकरणातून सुटका करण्याची मागणी केली.
मात्र, मॅनेजरसह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कंपनीची फसवणूक करून तीन व्यक्तींनी अशा जवळपास ३७ नागरिकांच्या नावावर बनावट कर्ज प्रकरण करून सुमारे ४५ लाखांहून अधिक रक्कम उचलली आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे एनओसी देऊ शकत नाही, असे सांगताच अमोल शिंदे चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत कंपनीच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कंपनीच्या कार्यालयाला चक्क टाळे ठोकले.
□ जिल्हाधिकाऱ्यांनी झापले
फसवणूक झालेल्या तरुणाला घेऊन शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. तुमची फसवणूक झाली हा तुमचा प्रश्न आहे. यामध्ये नाहक युवकांचा बळी घेऊ नका अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करू, असा इशारा दिला. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून फसवणूक झालेल्यांना एनओसी देण्याचे आश्वासन कंपनीच्या वतीने देण्यात आले.