पुणे : सहायक फौजदार म्हणून कार्यरत असलेले एकनाथ ठकाजी वाजे (वय ५३) यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ते मंचर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. आत्महत्येचे कारण आणखी समजू शकले नाही. Assistant Faujdar commits suicide by hanging at his residence
ही घटना काल बुधवारी (दि. २५) दुपारच्या सुमारास राजगुरुनगर जवळील चांडोली येथे घडली आहे. दरवाजा आतून लावून त्यांनी हे कृत्य केले. याबाबतची माहिती त्यांचे जावई आदित्य रवींद्र गभाले (वय २५, रा. मुक्ताई नगर नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात दिली. सहायक फौजदार एकनाथ वाजे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
याबाबत माहिती अशी की, आदित्य रवींद्र गभाले यांची पत्नी सुप्रिया या सोमवारी (दि. २३) माहेरी चांडोली (ता. खेड) येथे आई-वडिलांकडे गेल्या होत्या.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/548565853487815/
बुधवारी (दि. २५) आदित्य यांची पत्नी सुप्रिया हिने त्यांना फोन करून वडील एकनाथ वाजे यांनी शेजारी असणार्या मोकळ्या १३ नंबर फ्लॅटमध्ये स्वतःला कोंडून घेतले असून, आम्ही बराच वेळ दरवाजा वाजूनही ते दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास फ्लॅटचा दरवाजा तोडून आत जाऊन पाहिले असता एकनाथ वाजे यांनी बेडरूममधील हुकाला रस्सी बांधून गळफास घेतल्याचे दिसले.
एकनाथ वाजे यांचा गळफास सोडून त्यांना ग्रामीण रुग्णालय चांडोली येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. वाजे यांच्या आत्महत्येचे कारण समजले नसून याबाबत खेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनेचा तपास पोलिस जवान घोलप करत आहेत.
□ धक्कादायक, पुण्यात पडीक जमिनीचे परस्पर सौदे
पुणे : पुणे जिल्ह्यात खोटे आधारकार्ड वापरून, जी जमीन अधिकृतच नाही तिचे सौदे केल्या जात आहेत. अशा प्रकारात चांगलीच वाढ होत आहे. पोलीस प्रशासनाकडून सजग राहण्याचे आवाहन केलंय.
दुसऱ्यांच्या दुर्लक्षित, पडीक जमिनीच्या मालकांची महसूल विभागातून तसेच गुगल मॅपच्या माध्यमातून माहिती घेऊन, त्या जमिनीच्या मालकाचे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड तसेच बनावट कागद पत्रांच्या साह्याने बँकेत खाते उघडून, ती जमीन विकणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/548432123501188/