□ म्हेत्रे यांचा वडिलकीचा सल्ला
□ वाढदिवसानिमित्त हसापुरे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
सोलापूर : राजनीतीकार चाणक्यने मौर्यला राजा बनवले मात्र तो स्वतः कधीही राजा बनला नाही. त्याप्रमाणे सुरेश हसापुरे यांनी अनेकांना राजा बनवले मात्र ते कधी राजा झाले नाहीत. त्यामुळे हसापुरे तुम्ही ‘किंगमेकर’ होता आणि ‘किंगमेकरच’ रहा, आमदारकी मिळेल तेव्हा मिळेल मात्र जिल्हा परिषद आणि मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जनतेची सेवा कायम करत रहा, असे अपेक्षा माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी करून हसापुरे यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. In Hasapure you remain the kingmaker; See Siddharam Mhetre’s birthday show of strength after MLA
सुरेश हसापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त टाकळीकर मंगल कार्यालयात आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी सिद्धाराम म्हेत्रे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार संजयमामा शिंदे जिपचे अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, दक्षिण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हरीश पाटील, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे प्रभारी जुबेर प्रजापति यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले की, हसापुरे यांनी संघर्षमय वाटचाल करत राजकारणात प्रवेश केला, त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ते राजकारणात पुढे आले आणि जिल्ह्याचे किंगमेकर म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे सर्व पक्षातील नेत्यांबरोबर चांगले संबंध आहेत. या नेत्यांचा हसापुरे यांच्यावर विश्वासही आहे. त्यामुळे हसापुरे यांनी एक गोष्ट सांगितली तर ती होईलच असे सर्वांना वाटते. त्यामुळे त्यांना किंगमेकर म्हणून ओळखले जाते. मात्र अशी लोक अनेकांना जड जातात. त्यामुळे अशा लोकांना काहीजण जिल्ह्यातच ठेवू पाहतात. हसापुरे एक बहुआयामी नेतृत्व आहे. त्यांच्या विकास कामालाही तोड नसल्याचे म्हटले.
जिल्हा परिषद आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून त्यांनी कोट्यवधींची कामे केली आहेत. त्यामुळे हसापुरे यांनी सध्यातरी किंगमेकर राहावे जि. प. आणि मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जनतेची सेवा करत राहावे. प्रत्येकाला संधी मिळते. ती संधी हसापुरे यांनाही मिळेल आणि ते आमदारही होतील, असा अपेक्षा व्यक्त करत आम्ही कायम त्यांच्या पाठीशी राहू, असे म्हेत्रे म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आमदार संजय मामा शिंदे म्हणाले की, सुरेश हसापुरे यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे हसापुरे कायम विकासाची दूरदृष्टी ठेवून काम करतात. त्यांनी आपल्या कार्यकाळात चांगले काम केल्यामुळे त्यांना तीन टर्म जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संधी मिळाली. ते आपल्या कार्याच्या जोरावरच आज जिल्ह्यात पुढे आलेले आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडीत नेत्यांना जोडणारा म्हणून कोणाला तरी दुवा म्हणून काम करावा लागते , तेच काम हसापुरे चांगले करत आहेत. सुरेश हसापुरे यांच्या राजकीय वाटचालीत आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहू.
सभापती डोंगरे म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हसापुरे राजकारणात आले आणि आज ते किंगमेकर म्हणून ओळखले जातात. जिल्हा परिषद असो तहसील कार्यालय असो वा जिल्हाधिकारी कार्यालय असो हसापुरे जे सांगतील ते काम फायनल होते. आज जिल्हा परिषद निवडणुका सर्व विधानसभा निवडणूक असो विधानपरिषद निवडणूक असो अथवा सभापती निवडणूक असो प्रत्येक वेळी हसापुरे हे सूत्रधार असतात. प्रत्येक खुर्चीवर ते आपला माणूसच बसवतात. देशात ज्याप्रमाणे देशाचे नेते शरद पवारांच्या डोक्यात काय चालले आहे हे कळत नाही, त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये हसापुरे यांच्या डोक्यात काय चालले आहे तेच समजत नसल्याचे म्हटले. राजकीय वाटचालीत जनतेने कायम त्यांच्या पाठीशी उभे रहावे , अशी अपेक्षा व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना हसापुरे म्हणाले की, आज माझा वाढदिवस साजरा करावा, अशी इच्छा नव्हती. मात्र मित्रपरिवार आले आणि मार्गदर्शकांनी वाढदिवस साजरा केला. माझ्या आतापर्यंतच्या राजकीय जीवनात ज्यांनी मदत केली, ज्यांनी मला तीन वेळा जिल्हा मध्यवर्ती बँकेत पाठवले अशा लोकांचा सत्कार करावा अशी संकल्पना होती आणि ती या सत्यात उतरली, यातच आनंद आहे. यापुढे 24 तास लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहीन. यावेळी दक्षिण तालुक्यातील 60 सोसायट्यांमधील नूतन संचालकांचा आणि ज्येष्ठ तेरा नागरिकांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला.