Tuesday, February 7, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सोलापूर शिवसेना माजी आमदारांची रोहित पवारांवर टीका

उजनीवरून राष्ट्रवादीच्या विरोधात जनआंदोलन

Surajya Digital by Surajya Digital
May 29, 2022
in Hot News, राजकारण, सोलापूर
0
सोलापूर शिवसेना माजी आमदारांची रोहित पवारांवर टीका
0
SHARES
64
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : करमाळ्याचा आदिनाथ साखर कारखाना रोहित पवारांच्या बारामती ऍग्रोने चालवायला घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटलांनी करमाळ्याच्या लोकांना एक सल्ला दिला आहे. “आताच सगळ्यांनी शहाणं व्हावे. आपलं आपण, तुम्ही आम्ही आपला कारखाना चालवू पण इथं दुसरं कोणी येऊन कारखाना चालवणार असेल तर भविष्यकाळात तुम्हाला याठिकाणी गुलाम म्हणून रहावे लागेल”, असे पाटील म्हणाले. Former Shiv Sena MLA from Solapur criticizes Rohit Pawar Narayan Patil Ujani Jan Andolan

करमाळा तालुक्यातील वांगी येथे उजनी पाणी परिषदेची सभा झाली. त्यावेळी माजी आमदार नारायण पाटील यांनी‌ निशाणा साधत आताच सगळ्यांनी शहाणं व्हावे. आपलं आपण, तुम्ही आम्ही, आपला कारखाना चालवू पण इथं दुसरं कोणी येऊन कारखाना चालवणार असेल तर भविष्यकाळात तुम्हाला याठिकाणी गुलाम म्हणून रहावे लागेल अशी टीक  माजी आमदार नारायण पाटील यांनी यावेळी केली.

आदिनाथ साखर कारखान्यावरून नारायण पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. आता कारखान्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे. बंद असलेला आदिनाथ साखर कारखाना आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोने चालवायला घेतला असून त्याला करमाळा तालुक्यातून विरोध होवू लागला आहे. यामध्ये आता शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी उडी घेत रोहित पवार यांना विरोध केला आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

□ उजनीवरून राष्ट्रवादीच्या विरोधात जनआंदोलन

उजनी प्रदुषणमुक्त व्हावी यासाठी पर्यटन तथा पर्यटन तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना साकडे घालणार, अशी ग्वाही नारायण पाटील यांनी उजनी पाणी परिषदेच्या नियोजित कार्यक्रमात दिली.

उजनीतून लाकडी निंबोडी योजनेद्वारे पाणी उचलण्याचा राष्ट्रवादीने डाव आखला असून तो हाणून पाडण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील मैदानात उतरले आहेत. पाणी परिषद सभेद्वारे ते रान पेटवत आहेत. नुकतीच कंदर येथे उजनी परिषदेची तिसरी सभा पार पडली या वेळी ते बोलत होते. या परिषदेस जि प अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सभापती अतूल पाटील, अजितदादा तळेकर, माजी सभापती शेखर गाडे, माजी संचालक धूळाभाऊ कोकरे,नवनाथ शिंदे, मा जि प सदस्य चंद्रप्रकाश दराडे, जि प सदस्य बिभीषण आवटे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उजनी कलशाचे पूजन शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की पुणे, पिंपरी-चिंचवड भागातून भीमा नदीपात्रात घाण पाणी, कचरा सोडला जातो. विविध औद्योगिक कारखान्यांकडूनही विषारी व आरोग्यासाठी हानिकारक असलेले टाकाऊ रसायन मिश्रीत भीमा पात्रात सोडले जाते. याचा शेवट उजनी बॅकवॉटर परिसरातील भागात येऊन ठेपतो.

आज बॅकवॉटर परिसरातील अनेक गावे हे पाणी पिण्यासाठी म्हणून वापरतात. एवढच नव्हे तर सोलापूरसह इतर जिल्ह्यात हे पाणी पिण्यासाठी म्हणून उचलले जाते. या पाण्याचा परिणाम केवळ मनुष्याच्या आरोग्यावर होत नाही तर उजनी परिसरातील जमीनही आता नापीक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

देश परदेशातील विविध पाणी संघटना व जलतज्ञांनी उजनीचे पाणी पिण्यास लायक नसल्याचे संशोधन करुन जाहीर करुन टाकले आहे. मी स्वतः आमदार असताना सन २०१४-१९ दरम्यान हा प्रश्न अधिवेशनात मांडला. तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी माझ्या या प्रश्नाचे लेखी उत्तर देऊन संबंधीत महापालिकांना तात्काळ यावर उपाय योजना करण्याच्या सुचना दिल्या होत्या. आजही हा प्रश्न अतिशय गंभीर बनला असून किडणी, ह्रदय, मुत्राशय, मुळव्याध, पोटाचे विकार तथा कॅन्सर पर्यंत रोग या दुषीत पाण्यामुळे उजनी बॅकवॉटर परिसरातील नागरिकांना झाले आहेत.

 

Tags: #Former #ShivSena #MLA #Solapur #criticizes #RohitPawar #NarayanPatil #Ujani #JanAndolan#नारायणपाटील #राष्ट्रवादी#सोलापूर #करमाळा #शिवसेना #माजीआमदार #रोहितपवार #टीका #उजनी #जनांदोलन
Previous Post

Sidhu Musewala shot dead 63 जणांनी पाहिले : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

Next Post

suicide Akkalkot पत्नीला व्हिडिओ कॉल करून अक्कलकोटमध्ये पतीची आत्महत्या

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
suicide  Akkalkot पत्नीला व्हिडिओ कॉल करून अक्कलकोटमध्ये पतीची आत्महत्या

suicide Akkalkot पत्नीला व्हिडिओ कॉल करून अक्कलकोटमध्ये पतीची आत्महत्या

वार्ता संग्रह

May 2022
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697