अक्कलकोट : येथील फत्तेसिंह चौकातील राहत्या घरी एकोणपन्नास वर्षीय जिम इन्सक्टर यांने रविवारी (ता. 29) दुपारी साडेतीन वाजण्याच्या पूर्वी राहत्या घरी अज्ञात कारणावरून आत्महत्या केली. पत्नीला व्हिडिओ कॉल करून त्याने आत्महत्या केली. Husband commits suicide in Akkalkot by making video call to wife
राजकुमार दत्तात्रय ढेपे (वय ४९ वर्षे रा. फत्तेसिंह चौक, साहील पॅलेस जवळ, अक्कलकोट ) असे मयताचे नांव आहे. याची उत्तर पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली असून याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, राजकुमार ढेपे यांने अज्ञात कारणाने राहते घरातील बेडरूम मधील फॅनला साडी व बेडशीटच्या सहाय्याने गळफास लावून घेवून आत्महत्या केली.
मयत हे स्वामी समर्थ मंदिर परिसरात हॉटेल कृपासिंध्दू या नावाचे हॉटेल चालवत होते. पत्नी जयश्री ढेपे हिला व्हिडिओ कॉल करून मी आत्महत्या करत आहे असे सांगून आत्महत्या केली. पत्नी घरातील बेडरूममध्ये जावून पाहिले असता मयत बेडरूममधील फॅनला साडी व बेडशीटच्या साह्याने गळफास घेतले आहे. आईने मुलाला फोन करून बोलावून घेतले.
त्यानंतर मुलगा व आई जयश्री व सोबत आलेले प्रविण घाटगे व घरासमोर राहणारे अनिकेत सोनटक्के असे सर्वांनी मिळून मृतदेह खाली उतरवून त्यांना खाजगी वाहनातून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. खबर मुलगा शिवम राजकुमार ढेपे (वय २१ वर्षे) यांनी दिली. अधिक तपास पो.ना. शेख हे करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/551010043243396/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ घरनिकी येथून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल
मंगळवेढा : घरनिकी येथून एका 14 वर्षीय लहान मुलाला फुस लावून पळवून नेण्याचा प्रकार घडला असून त्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी ताजुद्दीन मुलाणी (रा.घरनिकी) यांचा 14 वर्षीय मुलगा शनिवारी (दि.28) दुपारी 12.30 वा. त्याच्या आईस दुकानातून खाऊ घेवून येतो, असे म्हणून घरातून निघून गेला. तो पुन्हा न परतल्याने त्याचा सर्वत्र शोध घेवून दुकानात जावून पाहिले. तो मिळून आला नाही. नातेवाईक,मित्र तसेच मारापूर, मल्लेवाडी, सिध्देवाडी. शरदनगर, देगांव, मंगळवेढा शहर येथे शोध घेवूनही तो न सापडल्याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची खात्री पटल्याने त्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.
त्याचे वर्णन -उंची 5 फुट,अंगाने सडपातळ,रंगाने गोरा,अंगात गुलाबी शर्ट,निळी जीन पँट अशा वर्णनाचा मुलगा कोणाच्या निदर्शनास आल्यास मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. याचा अधिक तपास पोलिस नाईक शिवाजी विभुते हे करीत आहेत.
□ शेटफळ येथे एकास मारहाण दोघावर गुन्हा दाखल
मोहोळ : शेटफळ (ता.मोहोळ) येथे पैशाच्या व्यवहारावरून आणि जुन्या रागातून दोघा जणांनी मिळून एका व्यक्तीला गंभीर मारहाण केल्याची घटना रविवारी (ता. 29) साडेपाच वाजणेच्या सुमारास असून मोहोळ पोलिस ठाण्यात त्या दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबतची हकिकत अशी की शेटफळ येथील रहिवासी असलेला तुकाराम दतात्रय पवार हा गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतो. काही दिवसापूर्वी त्याने आपला गाडीतील जुना टेप सोनू समाधान करंडे यास विकला होता. त्याचे पैसे बऱ्याच दिवसापासून देण्याची करंडे हा टाळाटाळ करत होता. समाधान करंडे हा शेटफळ चौकातील पंढरपूर रोडला असलेल्या त्याच्या वेलकम हॉटेलमध्ये संग्राम फाटेसह बसलेला दिसल्यावर फिर्यादीने त्याला आपले टेपचे पैसे मागितले.
परंतु तुझे कसले पैसे म्हणून हॉटेलमध्ये पडलेल्या पत्र्याने समाधानने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर मारहाण केली. त्यामुळे तुकारामच्या हाताला जखम होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होवू लागला. त्याचवेळेस त्या हॉटेलमध्ये असणारा त्याचा मित्र संग्राम बापू फाटे याने मी तुला माझ्या वाळूच्या टिप्परवर ड्रायव्हर म्हणून बोलावले पण तु आला नाही तुला मस्ती आली आहे, असे धमकावून हॉटेलमधीलच एक लोखंडी टॉमी घेऊन डोक्यात मागील बाजूला मारली. यात फिर्यादी चक्कर येऊन खाली पडला. त्याला पडलेला बघून संग्राम फाटेने गाडीतील तलवार घेऊन तुला आता खलासच करतो म्हणून धमकी दिली. लाथाबुक्क्याने मारहाणही केली. याबाबत सोनू समाधान करंडे व संग्राम बापू फाटे (रा. शेटफळ) यांचेवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/551006739910393/