● आत्महत्या का केली याचा तपास सुरू
सोलापूर : सोलापुरातील शेळगी परिसरात आई व मुलाने एकाच साडीने राहत्या घरी गळफास घेतला आहे. ही घटना आज सोमवारी ( 30 मे ) सकाळी उघडकीस आली. हे दृश्य पाहून सर्वजण हळहळ व्यक्त करीत होता. आत्महत्या का केली याचा तपास सुरू असून पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. In Solapur, mother and child took the same sari and strangled Mangalvedha
सोलापुरातील शेळगी परिसरात आई व मुलाने एकाच साडीने राहत्या घरी गळफास घेतला आहे. ही घटना 30 मे रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे. उमादेवी सिद्धेश्वर पुराणिक ( वय 62), दिग्विजय सिद्धेश्वर पुराणिक (वय 42, दोघे रा, शिवगंगा नगर, शेळगी) असे मृत आई व मुलाचे नाव आहे.
राहत्या घरी अज्ञात कारणावरून या दोघांनी एकाच साडीने गळफास घेतला. सकाळपासून घरात सामसूम दिसत होती. नेहमी घरातून ये जा करणाऱ्या घरात शांतता दिसत होती. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी आत घरात डोकावून पाहिले. दोघे गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आले.
याबाबत जोडभावी पेठ पोलिसांना ताबडतोब माहिती देण्यात आली. दोघांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकीत याबाबत नोंद झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
उमादेवी पुराणिक व दिग्विजय पुराणिक या दोघांनी आत्महत्या का केली? त्यांना काही मानसिक त्रास होते का? किंवा कोणी त्रास देत होते का? याबाबत पोलीस त्यांच्या नातेवाईकांकडून व शेजाऱ्यांकडून सखोल माहिती घेत आहेत. लवकरच आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती जोडभावी पेठ पोलिसांनी दिली आहे.
□ सात वर्षीय बालिकेच्या विनयभंग प्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल
मंगळवेढा : मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात सात वर्षीय मुलीस राहते घरात वाईट हेतूने नेवून तीचे चुंबन घेवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी विशाल मधूकर टपरे (रा.चिकलगी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील पिडीत सात वर्षीय मुलीस आरोपी विशाल टपरे याने 29 मे रोजी सायंकाळी 6.30 चे पूर्वी त्याच्या राहते घरी नेवून वाईट हेतूने तिचे चुंबन घेवून शरीराला स्पर्श करीत तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी पिडीत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.