सोलापूर : अवघ्या सात महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उद्या मंगळवारी ३१ मे रोजी विद्यमान पोलीस आयुक्त हरिश बैजल हे सेवानिवृत्त होत आहेत. सोलापूरला अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून सुधीर हिरेमठ यांची नियुक्ती झाली असून ते उद्या मंगळवारी पदभार घेणार आहेत. Sudhir Hiremath as Additional Commissioner of Solapur City Police
शहर पोलीस आयुक्तालयाची स्थापना १९९२ साली झाली. पोलीस आयुक्त सेवानिवृत्त होत असताना, दुसरीकडे शहरात सर्वत्र नवीन अधिकारी कोण येणार याची सुरू होती. वेगवेगळ्या नावांची चर्चा होत होती.
आज सोमवारी अचानक आयपीएस सुधीर हिरेमठ यांची अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. सध्या पुणे येथे सीआयडीमध्ये उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. पोलीस आयुक्त हरिश बैजल यांच्याकडून पदभार घेऊन अतिरिक्त पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ हे पदभार घेणार आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/551208949890172/
□ पोलीस हवालदार बडतर्फ ; पोलीस आयुक्त हरीश बैजल यांचा दणका
सोलापूर : सोलापूरचे पोलिस आयुक्त हरिश बैजल यांनी आरसीपीमध्ये नियुक्त पोलिस हवालदार आप्पा पवार यांना बडतर्फ केले. पोलिस खात्यातील शिस्तभंगप्रकरणी ही कारवाई केली असून, खुद्द बैजल यांनी यास दुजोरा दिला आहे.
यापूर्वी बळीराम माशाळकर यांनाही अशाच पद्धतीने बैजल यांनी बडतर्फ केले होते. एकूणच आयुक्त बैजल यांच्या या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांना धास्ती बसली आहे. तत्कालिन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहर पोलिस दलातील वसुलीबहाद्दरांना हेरून त्यांची मुख्यालयात बदली केली होती,तर काही जणांना निलंबित केले होते.
अंकुश शिंदे यांची बदली झाल्यानंतर आयुक्तपदाचा पदभार हरिश बैजल यांनी स्विकारल्यानंतर त्यांनीही हाच पायंडा चालू ठेवत या वसुलीबहाद्दर कर्मचाऱ्यांना मुख्यालयातच ठेवले होते.
परंतु,पोलिस खात्याच्या शिस्तीस बाधा पोहोचवणारे कृत्य केल्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी आयुक्त बैजल यांनी माशाळकर व आप्पा पवार यांना निलंबित केले होते. चौकशीअंती काही दिवसापूर्वी माशाळकर यांना सेवेतून बडतर्फ केले होते.पाठोपाठ पवार यांचीही चौकशी करून त्यांच्यावर नुकताच कारवाईचा बडगा उगारला.
● पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विद्यापीठामध्ये उद्या विविध उपक्रम
#सोलापूर #solapur #विद्यापीठ #PunyashlokAhilyaBai
#solapur #university
सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. #surajyadigita #सुराज्यडिजिटल
उद्या मंगळवारी (दि. 31 मे) सकाळी 10.30 वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन होईल. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या मनोगत व्यक्त करतील. या कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व अधिकारी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित राहतील.
याचबरोबर विद्यापीठाच्या सर्व संकुलातील व विभागातील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनचरित्र’ या विषयावर निबंध स्पर्धा होणार आहे. निबंध स्पर्धेसाठी दोन हजार शब्दांची मर्यादा देण्यात आली असून 7 जून 2022 पर्यंत भाषा व वांग्मय संकुलाकडे निबंध जमा करण्याचे आवाहन प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार यांनी केले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/551186093225791/