बार्शी : येथील सुभाष नगर परिसरातील पंकज नगरमध्ये राहणार्या एका महिलेची ओढणीने गळा आवळून हत्या झाल्याचे आढळून आले आहे. खून करणारा हा मयत महिलेबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता आणि हे कृत्य करून तो फरार झाला आहे. Barshi: Accused absconding after killing a woman in a live-in relationship
मयत महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्या बागबुल उर्फ शाकीर हुसेन शेख (रा. कलबंगा ता. नाक्षीपारा जि. नाडीया राज्य पश्चिम बंगाल) याने तिला ठार मारुन पलायन केल्याची फिर्याद पोलिस उपनिरीक्षक सारीका गटकुळ यांनी दिलीय. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मयत आणि अरोपी दोघेही पश्चिम बंगाल येथील आहे. मयत देहविक्रय व्यवसायात असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुस्लिमा लुथफार सरदार (वय 35) हिला शनिवारी (ता. 28) रात्री मयत अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिच्या शवविच्छेदन अहवालात अंगावर जखमा व गळफासाच्या खुणा आढळून आल्या. मृत्यूचे कारण गळा आवळल्यामुळे असल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिच्यासमवेत गेली 3 वर्षे राहणारा बागबुल हा शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास तिच्या घरी गेला होता. त्याच्या येण्यावरुन दोघांत वाद झाला. त्यानंतर शनिवारी तो तिला कामास जावू नको असे म्हणत होता. त्यावरुनही त्यांचे भांडण झाले.
दुपारी 4 वाजता बागबुलने तिची मुले महाबूर (वय 12) व असिफ ( वय 10 ) यांना खेळण्यासाठी घराबाहेर पाठविले. थोड्या वेळाने मुले परतली असता त्यांना मुस्लिमा ही किचन मध्ये गळ्याभोवी ओढणी गुंडाळलेल्या अवस्थेत निपचित पडलेली आढळून आली. त्यांनी घरमालक बापू मिरगणे यांना बोलावून तिला दवाखान्यात नेले. तिथे ती मयत झाली असल्याचे सांगण्यात आले. बागबुल दोघांचाही मोबाईल बंद करुन फरार झाला आहे. याबाबत पुढील तपास स.पो.नि. स्वप्निल इज्जपवार करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/551155993228801/
□ मयतीला गेल्यावर चोरट्यांनी घर फोडले; कुंभारी घरकुल येथील घटना
सोलापूर – सासऱ्याच्या अंत्यविधीसाठी गेल्यानंतर चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख रकमेसह २३ हजाराचे दागिने पळविले. ही चोरी कुंभारी घरकुल (ता.दक्षिण) सोलापूर येथे काल रविवारी (ता. 29) पहाटेच्या सुमारास घडली.
रवी कुमार बाबुराव कारंजे (रा. कुंभारी घरकुल) यांच्या सासर्याचे निधन झाल्यामुळे ते दुपारी विजयनगर येथे गेले होते. अंत्यसंस्कार आटोपून ते शनिवारी सायंकाळी घरी परतले. दिवाबत्ती करून पुन्हा सासऱ्याच्या घरी गेले होते. त्यानंतर ते पहाटे २ वाजता परत घराकडे आले असता त्यांना बंद घराचे कुलूप तोडल्याचे दिसले. लोखंडी कपाटातील दीड हजार रुपये रोख, आणि ७ ग्रॅम सोन्याचे दागिने असा ऐवज चोरीस गेल्याचे दिसून आले. त्याप्रमाणे त्यांनी वळसंग पोलिसात फिर्याद दाखल केली. सहाय्यक फौजदार दासरी पुढील तपास करीत आहेत .
□ मांगी येथील पुलावर ट्रकच्या धडकेने दुचाकी चालक ठार
सोलापूर – मांगी (ता. करमाळा) येथील पुलावर ट्रकच्या धडकेने दुचाकीवरील वसंत मारुती शिंदे (वय ४० रा. देवळाली ता. करमाळा) हा भंगार विक्रेता गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला. हा अपघात काल रविवारी (ता.29) सकाळच्या सुमारास घडला.
वसंत शिंदे हे आपल्या दुचाकीवरून जातेगाव येथे भंगार माल गोळा करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी पाठीमागून टीएन५२-एल-९०६५ या क्रमांकाचा ट्रकने धडक दिल्याने ते गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावले. या अपघाताची नोंद करमाळा पोलिसात झाली. ट्रकचा चालक गोविंद राज (रा. सेलम, तामिळनाडू) याला पोलीसांनी अटक करून गुन्हा दाखल केला. फौजदार माहुरकर हे पुढील तपास करीत आहेत.
■ शेतीच्या वादातून विवाहितेस मारहाण पतीसह तिघांवर गुन्हा
सोलापूर – विवाहितेच्या नावावर असलेली वडिलोपार्जित शेती पतीच्या नावावर करून दे, या कारणावरून विवाहितेस लोखंडी पाईपने मारहाण करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविण्यात आले. ही घटना कासेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथे शनिवारी (ता. 28) सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात सोलापूर तालुक्याच्या पोलीसांनी तिच्या पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
लक्ष्मी प्रमोद घोडके (वय २५ रा. कासेगाव) असे जखमी झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचा पती प्रमोद नागनाथ घोडके, विनायक (दिर) आणि जाऊ नीता घोडके सर्व रा.कामती) या तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लक्ष्मीच्या आई-वडिलांचे निधन झाले असून त्यांची ७ एकर शेती लक्ष्मीच्या नावावर आहे. ती शेती पतीच्या नावाने कर म्हणून तिला पती आणि दिराने मिळून लोखंडी पाईपने मारहाण केली. तर जाऊ नीता हिने तिला चापटाने मारून गळ्यातील २५ हजाराचे मंगळसूत्र तोडून नेली, असे लक्ष्मी घोडके हिच्या फिर्यादीत नमूद आहे. हवालदार मोरे पुढील तपास करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/551288993215501/