बंगळुरू : भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांच्यावर आज शाईफेक करण्यात आली. बंगळुरूमधील पत्रकार परिषदे दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी शाईफेक करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. या शाईफेकीमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. शाईफेक करणाऱ्यांना टिकेत यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असल्याचे वृत्त आहे. Rakesh Tikait Shifek on farmer leader Rakesh Tikait; Confusion in the program
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत यांच्यावर आज शाईफेक करण्यात आली. बेंगळुरूमधील पत्रकार परिषदे दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी शाईफेक करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे.
या शाईफेकीमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. शाईफेक करणाऱ्यांना टिकेत यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असल्याचे वृत्त आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/551288993215501/
गांधी भवनमध्ये शेतकरी नेते राकेश टिकेत आणि युद्धवीर सिंह हे पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. या दरम्यान, एका व्यक्तीने त्यांच्यावर काळी शाई फेकली. हे दोन्ही शेतकरी नेते एका स्टिंग ऑपरेशनबाबत भाष्य करण्यासाठी आले असल्याचे म्हटले जाते. या गोंधळातच एकाने शेतकरी नेत्यांवर शाईफेक केली आणि खुर्ची फेकण्यास सुरुवात केली. हा गदारोळ करणाऱ्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
एका स्थानिक वृत्तवाहिनीने कर्नाटकमधील शेतकरी नेते कोडिहल्ली चंद्रशेखर यांचे स्टिंग ऑपरेशन केले होते. चंद्रशेखर हे पैशांची मागणी करताना कॅमेऱ्यात कैद झाले. या व्हिडिओवर स्पष्टीकरण देण्यासाठी टिकेत आणि युद्धवीर पत्रकार परिषदेत आले होते. चंद्रशेखर यांना कोणत्याही परिस्थितीत आमचा पाठिंबा नसून शेतकऱ्यांना धोका करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी टिकेत करणार होते.
पत्रकार परिषदेत पत्रकार परिषदेत राकेश टिकेत यांना चंद्रशेखर यांच्याबद्दल विचारलं असता त्यांनी. चंद्रशेखर फ्रॉड माझा त्यांच्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं. यावर चंद्रशेखर यांच्या समर्थकांपैकी एकाने समोर बसलेल्या टिकेत यांच्यावर शाई फेकली. शाईफेक झाल्यानं टिकेत समर्थक भडकले आणि त्यांनी त्याला पकडलं. यावेळी चंद्रशेखर आणि टिकेत समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. दोन्ही गटाचे समर्थक भिडले हाणामारी झाली. एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्या.
》 सिद्धू मूसेवाला यांच्या निधनानंतर बॉलिवूडही हादरलं
#bollywood #shakes #death #surajyadigital #singer #सुराज्यडिजिटल #निधन #sidhumoosewala
□ सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली. सिद्धू यांच्या निधनाची बातमी ऐकताच बॉलिवूडकरांनाही दुःख अनावर झालं आहे. अभिनेता अजय देवगणपासून ते कॉमेडियन कपिल शर्मापर्यंत सगळ्यांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धू यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सिद्धू यांच्या निधनानंतर संपूर्ण कलासृष्टीच हादरली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/551208949890172/