सोलापूर – पेट्रोल पंप चालकांचे नुकसान होत असल्याने केंद्र सरकार व ऑइल कंपन्यांचे लक्ष वेधण्यासाठी उद्या मंगळवारी (३१ मे ) पेट्रोल पंप चालकांकडून पेट्रोल खरेदी बंद आंदोलन पुकारले असल्याची माहिती सोलापूर जिल्हा पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष संजय ताटे-देशमुख यांनी दिली. Petrol Pump Association in SolapurPetrol pump drivers strike in Solapur
केंद्र सरकारने गेल्या वर्षी दिवाळीमध्ये अचानक एक्साईज ड्यूटी पेट्रोल ५ रुपये व डिझेल १० रुपयांनी कमी केल्यामुळे सर्व वितरकांचे तीन लाख ते सात लाख रुपये एका दिवसात नुकसान झाले होते. आता २२ मे लाही अचानक सरकारने पेट्रोलवर ८ रुपये व डिझेलवर ६ रुपये एक्साईज ड्यूटी कमी केल्यामुळे पुन्हा एकदा वितरकांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. यामुळे पंप चालकांचे आर्थिक नुकसान झाले.
२०१७ पासून डिझेल व पेट्रोलचे भाव ५० रुपयांवरून ११० रुपयांवर गेले तरी एका नया पैशाची कमिशनमध्ये वाढ केली नाही. वितरकाला भांडवलात वाढ करावी लागली. बँकांची कर्जे वाढली. प्रसंगी खासगी सावकाराच्या दारात जाण्याची वेळ आली. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य कार्यकारी संघटनेची (फामफेडा) बैठक अध्यक्ष उदय लोध यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हा प्रमुखांची उपस्थिती होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/551208949890172/
या बैठकीत मंगळवार, ३१ मे रोजी केंद्र सरकार व ऑइल कंपन्यांचे लक्ष वेधण्यासाठी आणि झालेले नुकसान तसेच कमिशनसंबंधी लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचे खरेदी बंद आंदोलन करण्याचे ठरले. तसेच हे आंदोलन संपूर्ण देशभरात होणार आहे. या बैठकीस सोलापूर जिल्हा पेट्रोल पंप असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष संजय ताटे देशमुख, उपाध्यक्ष प्रकाश हत्ती, सचिव महेंद्र लोकरे आदी उपस्थित होते.
□ पेट्रोल पंप चालकांचा इंधन खरेदी न करण्याचा निर्णय, प्रवाशांना फटका बसणार?
सरकारविरोधात देशभरातील पेट्रोल पंप चालक-मालकांनी 31 मे रोजी इंधन खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोप पंपावर इंधन तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. केंद्र सरकराने पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी कपात केली. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देखील मिळाला. पण, त्यामुळे पेट्रोल डिझेल चालक मालक मात्र आक्रमक झाले आहेत. एका रात्रीत दरकपात झाल्यामुळे आपल्याला तोटा झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/551155993228801/