Monday, February 6, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

Solapur district सोलापूर जिल्ह्यात 41 अनाथ बालकांची जबाबदारी केंद्र सरकार घेणार : नरेंद्र मोदी

Central government to take responsibility for 41 orphans in Solapur district: Narendra Modi

Surajya Digital by Surajya Digital
May 30, 2022
in Hot News, सोलापूर
0
Solapur district सोलापूर जिल्ह्यात 41 अनाथ बालकांची जबाबदारी केंद्र सरकार घेणार : नरेंद्र मोदी
0
SHARES
45
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

□ कोव्हिड 19 मुळे अनाथ बालकांशी प्रधानमंत्र्यांचा ऑनलाईन संवाद

□ कोविडमुळे अनाथ बालकांची जबाबदारी केंद्र सरकार घेणार

सोलापूर : कोरोना महामारीने जगाला वेठीस धरले. महामारीत केंद्र आणि राज्य सरकारने ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, कोरोना लसीकरण उपलब्ध करून दिल्याने अनेकांचे प्राण वाचले. तरीही काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोविड-19 मुळे आई-वडिल गमावलेल्या अनाथ मुलांची जबाबदारी केंद्र सरकार घेणार असल्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. Central government to take responsibility for 41 orphans in Solapur district: Narendra Modi
Dialog

पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत मुलांना देण्यात येणारा लाभ, सेवा तसेच कोविड 19 मुळे अनाथ झालेल्या बालकांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने (ऑनलाईन) संवाद साधला.

सोलापूर जिल्ह्यात 41 बालके आई-वडिलांविना पोरकी झाली आहेत. आज संवादाच्या वेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, महिला व बालकल्याण अधिकारी डॉ. विजय खोमणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, बालकल्याण समितीच्या अध्यक्ष अनुजा कुलकर्णी, सदस्य प्रकाश ढेपे, सुवर्णा बुंदाले, बाल न्याय मंडळाचे प्रज्ञा खेंदाड, गीता तलकोकुळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांच्यासह बालके, त्यांचा सांभाळ करणारे पालक उपस्थित होते.

प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले की, मुलांनो तुमच्या आई-वडिलांचा मृत्यू भरून निघणार नाही. देशातील प्रत्येक व्यक्ती मुलांच्या सोबत असेल. मनोरंजन, खेळाबरोबर मार्गदर्शक ठरणारी चांगली पुस्तके वाचा. जीवन उपचाराने नाही तर व्यायामाने बरे होते. खेलो इंडियामध्ये सहभागी व्हा, योगामध्ये सामील व्हा. स्वत:वर विश्वास ठेवा, हार मानू नका. पीएम केअरमधून मुलांच्या शिक्षणासाठी सरकारी किंवा खाजगी शाळेत प्रवेश, पुस्तके, कपड्यांचा खर्च केंद्र शासन करेल. व्यावसायिक शिक्षणासाठीही मदत करण्यात येईल. यासोबतच संकल्प करा, तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, खूप मोठे व्हा, तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी देश सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

देशातील डॉक्टर, शास्त्रज्ञ यांच्यावर विश्वास ठेवल्याने कोरोनावरील औषधे आणि लस तयार करू शकलो. देशाबरोबर इतर देशालाही लस आणि औषधे पाठवू शकलो. सरकारी योजनांपासून कोणतीही गरीब व्यक्ती वंचित राहणार नाही, याला प्राथमिकता देण्यात येत असल्याचे पीएम मोदी यांनी सांगितले.

यावेळी 18 वर्षांच्या वरील प्रशांत शिवशरण, ओंकार पाटील, सोहम बुरगुटे, युवराज नागटिळक, अजय व्यवहारे यांना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि अपर जिल्हाधिकारी जाधव यांच्या हस्ते पीएम केअर कीट (विमा कार्ड, बँक पासबुक) देण्यात आले. उर्वरित बालकांना महिला व बालकल्याण अधिकारी डॉ. खोमणे, बालकल्याण समितीचे सदस्य यांच्या हस्ते कीट देण्यात आले.

□ बालकांना मिळणारा लाभ

अनाथ मुलांना लाभ बालकांची काळजी, संरक्षण करणे, शिक्षणाद्वारे सक्षमीकरण करणे आणि वयाच्या 18 ते 23 वर्षांदरम्यान विद्यावेतन देण्यात येणार आहे. 23 व्या वर्षी एकरकमी 10 लाख रूपये केंद्र सरकारचे आणि पाच लाख रूपये राज्य सरकारचे देण्यात येणार आहेत. विमा संरक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याला चार हजार रूपये देण्यात येणार असून पहिली ते 12 वीपर्यंत 20 हजार शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तांत्रिक शिक्षणासाठी 50 हजार शिष्यवृत्ती असून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून आरोग्य विमा प्रत्येक वर्षी असेल.

 

Tags: #Central #government #take #responsibility #orphans #Solapur #district #NarendraModi #Dialog#सोलापूर #जिल्हा #अनाथ #बालक #जबाबदारी #केंद्रसरकार #नरेंद्रमोदी #संवाद
Previous Post

निंबर्गी – मंद्रुप रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघातात एक ठार दोन जण जखमी  

Next Post

Petrol Pump Association सोलापुरात पेट्रोल पंप चालकांचे उद्या खरेदी बंद आंदोलन

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
Petrol Pump Association  सोलापुरात पेट्रोल पंप चालकांचे उद्या खरेदी बंद आंदोलन

Petrol Pump Association सोलापुरात पेट्रोल पंप चालकांचे उद्या खरेदी बंद आंदोलन

वार्ता संग्रह

May 2022
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697