दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी मंद्रुप रस्त्यावर रविवारी (ता. 29) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दोघांना मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. Nimbergi – One killed, two injured in two-wheeler accident on Mandrup road
दोघांवर प्राथमिक उपचार करून प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटकडे पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळाली. पुढील हकीकत अशी की मंद्रूप-निंबर्गी रोडवर दुचाकीच्या समोरासमोर धडक झाल्याने निंबर्गी येथील रहिवासी बाबूराव अप्पाराव चिक्कलगी (वय ३६) मृत व्यक्तीचे नाव आहे.
गंभीर जखमी अवस्थेत असलेले अनिल गुरय्या वरगटी (वय २७) शिवानंद करजगी (लय ६२, दोघे रा.निंबर्गी) येथील रहिवाशी आहेत. त्यांना जखमी अवस्थेत १०८ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने नागरिकांनी मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे अपघाताची वार्ता समजताच संपूर्ण निंबर्गी परिसरात शोककळा पसरली.
□ वाळू चोरी पकडून दिल्याच्या संशयावरुन मारहाण
बार्शी : बार्शी तालुक्यातील मुंगशी येथील जयसिंग हरिदास क्षीरसागर याने पोलिसांना टीप देवून वाळूची चोरी पकडून दिल्याच्या कारणास्तव त्याच्यासह कुटुंबियांना मारहाण झाली आहे. यात 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/551155993228801/
गावातील उमेश शिवाजी क्षीरसागर, आशिष उमेश क्षीरसागर, शुभम उमेश क्षीरसागर, अशोक गेनदेव क्षीरसागर, राम अशोक क्षीरसागर, लक्ष्मण अशोक क्षीरसागर, नानासाहेब गेनदेव क्षीरसागर, पांडूरंग नानासाहेब क्षीरसागर, ज्ञानेश्वर नानासाहेब क्षीरसागर, विनोद दिलीप क्षीरसागर, दिग्विजय दत्तात्रय क्षीरसागर, विकास माणिक क्षीरसागर, दिलीप गेनदेव क्षीरसागर, कुमार सत्यवान क्षीरसागर, दत्तात्रय बाबासाहेब क्षीरसागर यांच्याविरुध्द वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
काही दिवसांपूर्वी मुंगशी येथील दिग्विजय क्षीरसागर यांचा चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला गेला होता. त्याची टिप फिर्यादीने दिली असा संशय घेवून या सर्वांनी घरात घुसून त्यास शिवीगाळ, लाथाबुक्क्याने मारहाण केली. लोखंडी गजाने कपाळावर मारले. यावेळी भावजयमध्ये आली असता तिला कपाळावर तलवारीने मारहाण करुन तिच्या गळ्यातील 3 तोळ्याचे गंठण पळविले. व ट्रॅक्टर पकडल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून घरातील चेकबुक पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
□ शेतीच्या वादातून विवाहितेस मारहाण; पतीसह तिघांवर गुन्हा
सोलापूर – विवाहितेच्या नावावर असलेली वडिलोपार्जित शेती पतीच्या नावावर करून दे, या कारणावरून विवाहितेस लोखंडी पाईपने मारहाण करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविण्यात आले. ही घटना कासेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथे शनिवारी (ता. 28) सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात सोलापूर तालुक्याच्या पोलिसांनी तिच्या पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
लक्ष्मी प्रमोद घोडके (वय २५ रा. कासेगाव) असे जखमी झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचा पती प्रमोद नागनाथ घोडके, विनायक (दिर) आणि जाऊ नीता घोडके सर्व रा.कामती) या तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लक्ष्मीच्या आई-वडिलांचे निधन झाले असून त्यांची ७ एकर शेती लक्ष्मीच्या नावावर आहे. ती शेती पतीच्या नावाने कर म्हणून तिला पती आणि दिराने मिळून लोखंडी पाईपने मारहाण केली. तर जाऊ नीता हिने तिला चापटाने मारून गळ्यातील २५ हजाराचे मंगळसूत्र तोडून नेली.असे लक्ष्मी घोडके हिच्या फिर्यादीत नमूद आहे. हवालदार मोरे पुढील तपास करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/551006739910393/