मोहोळ : मोहोळ तालुका पंचायत समितीच्या आवारामध्ये बचत गटांच्या उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी बांधण्यात आलेले गाळे ज्या प्रयोजनासाठी दिलेले आहेत, त्यासाठी ते गाळे न वापरता झेरॉक्स व इतर उद्योगासाठी वापर करत असल्याने सदरचे गाळे बचत गटांना देण्यात यावे, व बेकायदेशीरपणे गाळे वापरणा-यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी नागेश बिराजदार यांनी मोहोळ पंचायत समिती समोर हलगीनाद आंदोलन केले. Halginad agitation in front of Mohol Panchayat Samiti; Death of a young player in Solapur
याबाबत आंदोलनकर्ते नागेश बिराजदार यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोहोळ तालुका पंचायत समितीच्या आवारात बचत गटांच्या उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी गाळे बांधण्यात आलेले आहेत, मात्र सदर गाळ्यांवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी झेरॉक्स व इतर उद्योग करण्यात येत आहेत. तरी या संदर्भात योग्य ती कारवाई करून येथील अतिक्रमण काढून सदरचे गाळे बचत गटांना देण्यात यावे. या मागणीसाठी आज शुक्रवारी ( दि.३ जून) पंचायत समिती समोर आंदोलनकर्ते नागेश बिराजदार यांनी हलगी नाद आंदोलन केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/553853116292422/
यावेळी राहुल तावसकर, संगीता पवार, मंगेश पांढरे, अनिता बळवंतराव, सुरज तलफदार, गोरख सरवदे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
याबाबत नुकताच पदभार घेतलेले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे यांनी सांगितले की, सदर गाळ्यांबाबत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित गाळेधारकांना नोटीस बजावण्यात आली असून याबाबत चौकशी समिती नेमून त्याने दिलेल्या अहवालानुसार पुढील योग्य ती कारवाई संबंधितांवर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
□ युवा कबड्डीपटूचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर : रात्री नळाला आलेले पाणी भरत असताना विजेचा धक्का बसून सोलापुरात एका युवा कबड्डीपटूचा दुर्दैवी मृत्यू झाला.
भीमाशंकर हनमंतू जगले (वय २०, रा. धोंडिबा वस्ती) असे या कबड्डीपटूचाचे नाव आहे. ही घटना रामवाडी परिसरात घडली. बुधवारी (ता. 1) रात्री १० वाजता ही घटना घडली. बुधवारी रात्री रामवाडी परिसरात नळाला पाणी आले होते.
पाणी भरण्यापूर्वी त्याने विद्युत भीमाशंकर मोटार चालू केली. पाईपद्वारे पाणी भरत असताना अचानक विजेचा धक्का बसला आणि भीमाशंकरचा जागीच मृत्यू झाला. तो आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. तो कबड्डीपटू म्हणून ओळखला जात होता.
https://www.facebook.com/109399567404448/posts/553750116302722/