Friday, January 27, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

महाराष्ट्रात मान्सून दाखल तर कृषीमंत्री शेतक-यांना वा-यावर सोडून आसामच्या चिंतन शिबिरात दाखल

Monsoon arrives in Maharashtra, while Agriculture Minister leaves farmers on air and enters Chintan Shivir in Assam

Surajya Digital by Surajya Digital
June 24, 2022
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
0
महाराष्ट्रात मान्सून दाखल तर कृषीमंत्री शेतक-यांना वा-यावर सोडून आसामच्या चिंतन शिबिरात दाखल
0
SHARES
46
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई : राज्यात मान्सून सुरू झाला आहे. शेतकरी पीक पेरणीच्या कामात व्यस्त होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी विनंती केली आहे. Monsoon arrives in Maharashtra, while Agriculture Minister leaves farmers on air and enters Chintan Shivir in Assam

कालपर्यंत मुंबईत असलेले दादा भुसे आज सकाळपासून नेमके कुठे? आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात होता. भुसे देखील शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. कृषीमंत्री दादा भुसे नाशिकमधील आमदार असून ते गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेशी जोडलेले आहेत. नाशिकमधील कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

कालपर्यंत एकनिष्ठ म्हणून उद्धव ठाकरे यांच्या सोबत मुंबईत असलेले कृषीमंत्री दादा भुसे यांनी देखील शिंदे यांच्या गोटात गेले आहे. एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व विश्वासू समजले जाणारे संजय राठोड देखील गुवाहाटीला पोहचले आहेत. उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर देखील काही आमदार, शिंदे यांच्या गोटात दाखल होत आहेत. ही संख्या वाढतच चालली असल्याने शिवसेना एकटी पडत चालल्याचे चित्र आहे.

या ट्विटमध्ये खरीप हंगामात कृषी मंत्री प्रत्येक आठवड्यात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात. सध्या राज्यात पाऊसकमी आहे, पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यामंत्री कृपया आपण लक्ष द्या, अशी विनंती त्यांनी केली आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आधी सूरत आणि आता गुहाटीला आपल्यासोबत जवळपास 40 आमदारांना हॉटेलवर ठेवले आहे. यामुळे राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

हम हार मानने वाले नही है, हम जितेंगे, फ्लोअर टेस्टमध्ये जिंकू आणि जर लढाई रस्त्यावर झाली, तर तिकडेसुद्धा जिंकू, ज्यांना आमचा सामना करायचा आहे, ते मुंबईत येऊ शकतात. आम्ही पूर्ण तयारी केलीय, तुम्ही आता याच हे आमचे आव्हान आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये संजय राऊत, शरद पवार, दिलीप वळसे पाटील आणि अनिल देसाईंमध्ये बैठक झाली. त्या बैठकीनंतर संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

शिवसेना खासदार संजय राऊत हे मातोश्रीवर पोहोचले आहेत. राज्यातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांची मातोश्रीवर बैठक सुरू आहे. आता तिथे संजय राऊत पोहोचले आहेत. त्यामुळे लवकरच मोठी घोषणा होऊ शकते.

ठाणे शहरात शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे 60 नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती आहे. ठाणे महापालिकेवर गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकत आहे. इतके नगरसेवक बंडखोर गटात एकत्र आल्यास ठाणे शहरातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अस्तित्वही संपुष्टात येऊ शकते.

 

 

□ एकनाथ शिंदे विधानावरून पलटले

 

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आपल्या विधानावरून पलटले आहेत. आमच्या संपर्कात कोणतीही राष्ट्रीय पार्टी नाही, असे शिंदेंनी आता स्पष्ट केले आहे. याआधी एक राष्ट्रीय पार्टी आहे, एक महाशक्ती आहे, आपल्याजवळ त्यांची पूर्ण ताकद आहे, असे शिंदे यांनी म्हटले होते. त्यांनतर शिंदेंच्या बंडामागे भाजप आहे, अशी चर्चा सुरु झाली. मात्र बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांची शक्ती आपल्याकडे आहे, असे शिंदेंनी म्हटले.

 

 

 

Tags: #Monsoon #arrives #Maharashtra #Agriculture #Minister #leaves #farmers #air #enters #ChintanShivir #Assam #political#महाराष्ट्र #मान्सून #दाखल #कृषीमंत्री #शेतकरी #वा-यावर #आसाम #चिंतन #शिबिर #दाखल #राजकारण
Previous Post

वेळ निघून गेली, संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंना आव्हान, मुंबईत येऊन सामना करा

Next Post

ठाकरे सरकारला मोठा धक्का, नरहरी झिरवाळ यांची हकालपट्टी करण्याचा ठराव

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
ठाकरे सरकारला मोठा धक्का, नरहरी झिरवाळ यांची हकालपट्टी करण्याचा ठराव

ठाकरे सरकारला मोठा धक्का, नरहरी झिरवाळ यांची हकालपट्टी करण्याचा ठराव

वार्ता संग्रह

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« May   Jul »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697