Monday, February 6, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

पोकलँडचे बकेट डोक्यावर पडून करमाळ्यात शेतकरी ठार, पोकलँड ऑपरेटरविरुद्ध गुन्हा दाखल

Solapur Pokland bucket falls on head, kills farmer in Karmala, case filed against Pokland operator

Surajya Digital by Surajya Digital
June 29, 2022
in Hot News, सोलापूर
0
पोकलँडचे बकेट डोक्यावर पडून करमाळ्यात शेतकरी ठार, पोकलँड ऑपरेटरविरुद्ध गुन्हा दाखल
0
SHARES
104
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : विहिरीच्या जागेची पूजा करताना पोकलँडचे बकेट डोक्यावर पडून करमाळा तालुक्यातील देवळालीत शेतकरी ठार झाला आहे. यात पोकलँड ऑपरेटरविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.  Solapur Pokland bucket falls on head, kills farmer in Karmala, case filed against Pokland operator

करमाळा तालुक्यातील देवळाली येथे विहीर खोदण्याकरता जागेची पूजा करताना पोकलँडचे बकेट अंगार पडून विहीर मालक जागीच ठार झाला आहे. श्रीकृष्ण गुंड असे यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी ठार झालेल्या शेतकऱ्याचा मुलगा संदीप श्रीकृष्ण गुंड यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोकलँड ऑपरेटरविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

गुंड यांच्या शेतात ५८/२/अ/१ येथे विहीरीचे काम करायचे होते. त्यासाठी पोकलँड मशीनच्या मदतीने विहीर खोदण्यासाठी विहिरीच्या जागेची पूजा करत असताना मशीनचे बकेट श्रीकृष्ण गुंड यांच्या डोक्यावर आणून उभा केले होते. हे बकेट पडल्याने त्यांचा जखमी होऊन मृत्यू झाला.

बकेट अंगावर पडून दुखापत होईल याची जाणीव असतानाही ऑपरेटरने डोक्यावरून बकेट आजूबाजूला केले नाही. ते बकेट वडिलांच्या अंगावर पडून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ऑपरेटरविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास पोलिस उपनिरीक्षक माहूरकर हे करत आहेत.

श्रीकृष्ण गुंड यांच्या शेतात विहिरीचे काम करायचे होते. त्यासाठी मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास पोकलेन मशिनच्या मदतीने विहिर खोदण्यासाठी विहिरीच्या जागेची पूजा करत होते. याच दरम्यान पोकलेन मशिनचे बकेट श्रीकृष्ण गुंड यांच्या डोक्याच्या वरतीच होते. पूजा सुरु असताना अचानक हे बकेट गुंड यांच्या डोक्यावर पडले.

या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. बकेट अंगावर पडून दुखापत होईल याची जाणीव असतानाही ऑपरेटरने डोक्यावरून बकेट आजूबाजूला केले नाही. ते बकेट वडिलांच्या अंगावर पडून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ऑपरेटरविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक माहूरकर हे करत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

□ विहीरीत पडलेल्या कुत्र्याला दिले जीवदान, एनिमल राहतच्या टीमची कामगिरी

सोलापूर : वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन असोसिएशन ऑफ सोलापूर व एनिमल राहत यांच्या संयुक्त विद्यमाने ७५ फूट खोल विहीरीत पडलेल्या एका भटक्या कुत्र्याला जीवदान देण्याची सुखद घटना घडली आहे.

 

 

या घटनेची माहिती अशी की, उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ येथील शेतकरी ज्ञानेश्वर साठे यांच्या ७५ फूट खोल विहिरीत एक कुत्रा पडला असल्याची माहिती नागेश ननवरे यांनी एनिमल राहतचे अजित मोटे यांना फोनद्वारे दिली. यानंतर वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन असोसिएशन ऑफ सोलापुरचे सुरेश क्षीरसागर व प्रवीण गावडे आणि एनिमल राहतची टीम बीबी दारफळकडे रवाना झाली. यानंतर साठे यांच्या शेतात दाखल झाल्यावर विहिरीची पाहणी केली असता बांधलेल्या विहीरीत खाली उतरण्यासाठी तारेच्या पायऱ्या ६० फुटापर्यंत आणि १५ फूट खोल भाग पायऱ्या नसलेला दिसून आला.

 

यानंतर वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन असोसिएशन ऑफ सोलापुरचे सुरेश क्षीरसागर, एनिमल राहतचे महेश क्षीरसागर हे दोघे जण तारेच्या पायऱ्या वरून विहीरीत खाली उतरले व खालच्या पायऱ्या नसलेल्या भागात हारनेसच्या साहाय्याने उतरुन विहीरीत पडलेल्या कुत्र्याला नेटच्या सहाय्याने पकडले. यानंतर त्याला भुलीचे इंजेक्शन देऊन त्याला विहिरीतून वर काढले व पुढील उपचारासाठी एनिमल राहतकडे सुपूर्द केले.

या बचाव कार्यात वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन असोसिएशन ऑफ सोलापुरचे सुरेश क्षीरसागर, प्रवीण गावडे, एनिमल राहतचे डॉ. अनिकेत नावकर, अजित मोटे, सोमनाथ देशमुख, गणेश जावीर, महेश क्षीरसागर, शेतकरी ज्ञानेश्वर साठे, दत्तात्रय साठे हे सहभागी झाले होते.

 

 

Tags: #Solapur #Pokland #bucket #falls #head #kills #farmer #Karmala #casefiled #operator#पोकलँड #बकेट #डोक्यावर #सोलापूर #करमाळा #शेतकरी #ठार #ऑपरेटरविरुद्ध #गुन्हा #दाखल
Previous Post

उद्या मुंबईत शिंदे गट येणार, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार – एकनाथ शिंदे

Next Post

सांगली : म्हैसाळ हत्याकांड प्रकरणी धीरज सुरवसेला पोलीस कोठडी, बागवान दवाखान्यात दाखल

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सांगली : म्हैसाळ हत्याकांड प्रकरणी धीरज सुरवसेला पोलीस कोठडी, बागवान दवाखान्यात दाखल

सांगली : म्हैसाळ हत्याकांड प्रकरणी धीरज सुरवसेला पोलीस कोठडी, बागवान दवाखान्यात दाखल

वार्ता संग्रह

June 2022
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« May   Jul »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697