Friday, January 27, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश

तोंडले - बोंडले येथे तोफांची सलामी

Surajya Digital by Surajya Digital
July 8, 2022
in Hot News, सोलापूर
0
नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश
0
SHARES
84
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर : आषाढ शु. अष्टमीला तोंडले येथून सोहळा निघाल्यावर वाटेत सोपानकाकांच्या पालखीची व माउलींच्या पालखीची बंधु भेट माळशिरस तालुक्याच्या हद्दीत झाली. दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माउलींचा पालखी सोहळा विसावतो. याच वेळेस सोपानकाकाकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो. सोपानकाकांचा रथ माउलींच्या रथा शेजारी आल्यावर थोडा वेळ थांबतो. यावेळी दोन्ही संस्थानकडून परस्परांना नारळ प्रसाद दिला जातो. तत्पुर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ठाकूर बुवा समाधी येथे नेत्रदीपक गोल रिंगण संपन्न झाले. Netradipak arena and palanquins of fraternal saints enter Pandharpur taluka Ashadi Wari Solapur Warkari

 

 

माउलीची पालखी वेळापूर येथून प्रस्थान झाल्यानंतर ठाकूर बुवा समाधी या ठिकाणी पालखी पोहचली. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा माउली माउली , टाळ मृदुंग च्या जयघोष करीत रिंगण सोहळा पार पडला रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली. काही वेळातच माळशिरस तालुक्याच्या हद्दीत जेष्ठ बंधू सोपानदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखीची भेट झाली.या दोन पालख्या एकमेकान भेटल्या. या वेळी उपस्थित भाविकांनी विठ्ठल विठ्ठलचा जयघोष केला. माउलीच्या पालखी विश्वस्तांनी सोपानदेव यांच्या मानकरी याना मानाचा नारळ प्रसाद दिला. बंधू भेटीचा भावपूर्ण सोहळा पाहून भाविक सुखावले. पुढे माउलीची पालखी भंडीशेगाव येथे मुक्कामी पोहचली.

 

जगद्गुरू संत तुकारम महाराज यांच्या पालखीने बोरगाव पालखी मार्गस्थ होत तोंडले बोंडले या ठिकाणी पोहचली. या ठिकाणी पालखीतील सर्व भाविक धावले. तुका म्हणे धावा … आहे पंढरीस विसावा या अभंगाप्रमाणे भाविकांनी धावा केला. आणि पालखी पिराची कुरोली येथे मुक्कमी पोहोचली.

 

यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, पंढपूर तालुक्यात आगमण झाले. या पालख्यांचे पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने गटविकास अधिकारी प्रशांत काळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी स्वागत केले.

 

□ तोंडले-बोंडले येथे तोफांची सलामी !

 

वेळापूर : पालखी सोहळा दुपारी बोंडले येथे आल्यानंतर सरपंच विजयराव देशमुख , उपसरपंच महेंद्र लोंढे यांच्यासह ग्रामस्थांनी माऊलींच्या सोहळ्याचे स्वागत केले व तोफांची सलामी दिली.

 

येथे माऊलींची पालखी रथातून उतरवून खांद्यावर घेण्यात आली. ती तोंडले गावाच्या दिशेने नेण्यात आली. दरवर्षी तोंडले गावात जाताना नंदाच्या ओढ्याला पाणी असते. या पाण्यात माऊलींचा पालखी सोहळा ओलाचिंब केला जातो. आता नंदाच्या ओढ्यावर पूल बांधण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सोहळ्यावर गुलाब पाण्याचे शिंपण करण्यासाठी शॉवरची व्यवस्था केली होती.

या गुलाब पाण्याने माऊलींना जलाभिषेक घालण्यात आला. तोंडले गावचे सरपंच भिकाजी लोंढे , उपसरपंच सुहास निकम यांच्यासह ग्रामस्थांनी माऊलींना तोफांची सलामी व पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करून सोहळ्याचे स्वागत केले. याठिकाणी दुपारचा नैवेद्य व विश्रांतीसाठी सोहळा विसावला.

 

घ्यारे भोकरे भाकरी |
दहि भाताची शिदोरी ॥

नंदाच्या ओढ्यावर आपल्या गोपालांसमवेत श्रीकृष्णाने गोपाळकाला केल्याची आख्यायिका येथे सांगितली जाते. हीच परंपरा पुढे चालू ठेवीत गेल्या शेकडो वर्षापासून येथे दिंड्यांना थालीपीठ, दही, विविध प्रकारच्या चटण्या, उसळा, माडगं, भाकरी, भात, लोणचे अशा प्रकारची शिदोरी तोंडले-बोंडले परिसरासह तांदुळवाडी, शेंडेचिंच, माळखांबी, दसूर, खळवे आदि भागातील गावकरी घेवून येतात आणि वारकरी या शिदोरीचा आस्वाद घेतात. वासकरांच्या दिंडीत वारकर्‍यांनी या शिदोरीचा आनंद घेतला.

 

संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी तोंडलेतील हनुमान मंदिरात,संत तुकाराम महाराज यांचा पालखी रथ बोंडले येथील श्रीपूर चौकात तर संत सोपानदेव महाराज यांची पालखी श्री विठ्ठल मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली होती.

 

आज दिवसभर गावक-यांच्या घरी दिंड्या,वारकरी यांचा सकाळचा नाष्टा,दुपारचे भोजन व विश्रांती यासाठी राबता होता. दुपारच्या विसाव्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज व संत सोपानराव महाराज यांचा पालखी सोहळा भंडीशेगाव तर संत तुकाराम महाराज यांचा सोहळा प.कुरोली कडे मुक्कामासाठी रवाना झाला.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ विठ्ठल नामात अवघी दुमदमली तोंडले – बोंडले नगरी

 

वेळापूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीच्या विठ्ठलरायाच्या भेटीची आस धरून निघालेले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संत सोपानदेव महाराज यांचे पालखी सोहळे पालखी महामार्गावरील तोंडले-बोंडले (ता.माळशिरस) येथे गुरूवारी दाखल झाले. यामुळे लाखों वैष्णवांच्या विठ्ठल नामाने अवघी नगरी दुमदमली.

 

विठ्ठल विठ्ठल गजरी! अवघी दुमदमली पंढरी!!
होतो नामाचा गजर! दिंड्या पताकांचा भार!!
निवृत्ती ज्ञानदेव सोपान! अपार वैष्णव ते जाण!!
हरि कीर्तनाची दाटी! तेथे चोखा घाली मिठी!!

 

प्रमुख तीन पालखी सोहळ्यांचे एकत्र येण्याने उपरोक्त अभंगाच्या उक्तीप्रमाणेच स्थिती तोंडले-बोंडले नगरीत पाहवयास मिळाली.संत सोपानदेव महाराज यांचा पालखी सोहळा रात्रीच येथे मुक्कामासाठी उतरला होता. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळा वेळापूर व बोरगाव येथील मुक्काम आटोपून दुपारच्या भोजन व विसाव्यासाठी दाखल झाले होते. परंतू पंढरपूरच्या दिशेने जाणा-या दिंड्यांची रीघ पहाटेपासूनच पालखी महामार्गावर लागली होती. पताकाधारी वारकऱ्यांच्या दिंड्या पुढे सरकत असताना टाळ मृदुंगाचा नाद आणि विठ्ठल नामाचा जयघोष याने अवघा परिसर दुमदुमून गेला होता.

कोरोनाच्या संकटातून सावरल्यानंतर खंडित झालेले संतांच्या पालखींचे सोहळे आपल्या गावात दाखल होत असल्याने गावकरी वारकऱ्यांच्या सेवेत तल्लीन होऊन गेले होते. संतांचे दर्शन व भेटीने भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान व तृप्तीची झलक झळकत होती.

 

 

 

Tags: #Netradipak #arena #palanquins #fraternal #saints #enter #Pandharpur #taluka #Ashadi #Wari #Solapur #Warkari#नेत्रदीपक #रिंगण #बंधुभेट #संत #पालखी #पंढरपूर #तालुक्यात #प्रवेश #सोलापूर #आषाढीवारी
Previous Post

‘विठ्ठल’वर अभिजित पाटलांचे निविर्वाद वर्चस्व : 21 पैकी 20 जागांवर विजय

Next Post

‘विठ्ठल’चा चेअरमन विधानसभेच्या आखाड्यात उतरतोच; विठ्ठल परिवाराला मिळाले आक्रमक नेतृत्व

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
‘विठ्ठल’चा चेअरमन विधानसभेच्या आखाड्यात उतरतोच; विठ्ठल परिवाराला मिळाले आक्रमक नेतृत्व

'विठ्ठल'चा चेअरमन विधानसभेच्या आखाड्यात उतरतोच; विठ्ठल परिवाराला मिळाले आक्रमक नेतृत्व

वार्ता संग्रह

July 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Jun   Aug »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697