सोलापूर : ऐन आषाढी एकादशीच्या तोंडावर राज्यातील नगरपलिका निवडणुका जाहीर होत आचारसंहिता लागू झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या महापूजेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, कोणत्याही योजना, विकासनिधी यांची घोषणा न करण्याच्या अटीवर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा करण्यास परवानगी दिली आहे. On this condition, the Election Commission allowed the Chief Minister to pay homage to Vitthal
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या दिवशी राज्यात राजकीय भूकंपास प्रारंभ झाला. सरकार बदलण्याची चिन्हे पालखी सोहळ्याच्या प्रस्थानापासून सुरू झाल्याने श्री विठ्ठलाची महापूजा कोणाच्या हस्ते होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच शपथविधीनंतर या प्रश्नावर पडदा पडलेला असताना राज्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा होणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता.
याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला हिरवा कंदील दाखवला होता. मात्र, कोणतीही योजना किंवा निधीची घोषणा न करता मुख्यमंत्र्यांना श्री विठ्ठलाची महापूजा करता येणार आहे. तसेच, या कार्यक्रमासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्याची अट घातली आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यासही हरकत नाही. मात्र, त्याठिकाणीही कोणतीही घोषणा करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्याच्या पूर्व नियोजित दौऱ्यात कोणताही फरक किंवा बदल झालेला नाही. राज्यात नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता सुरू असली तरी निवडणूक आयोगाने काही अटी घालून महापूजेला परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रथेप्रमाणे महापूजा होईल, असे सोलापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी स्पष्ट केले.
□ अखेर वारकऱ्यांसाठी टोलमाफीचे परिपत्रक जारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसाठी टोलमाफीचा निर्णय घेतला होता. परंतू तरी देखील वारकऱ्यांकडून टोलवसुली केली जात होती. याच्या बातम्या प्रसिध्द झाल्यावर, राज्य सरकारने यासंबंधीचे परिपत्रक काढले आहे. ही सवलत फक्त 15 जुलैपर्यंत देण्यात आली आहे. उद्या म्हणजेच 10 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे खूप लोक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात.
https://www.facebook.com/109399567404448/posts/578096310534769/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ आषाढी यात्रा : पंढरपुरात दहा लाख भाविक दाखल झाल्याचा अंदाज
पंढरपूर – आषाढी सोहळ्यासाठी दहा लाख भाविक पंढरपूरला आले असावेत, असा अंदाज आहे. दरम्यान दशमी दिवशी भरपावसात पालखी सोहळ्यांनी वाखरीतून प्रस्थान ठेवून पंढरपूर शहरात प्रवेश केला.
खरे दोन दिवस नवमी व दशमी ला पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे भाविकांची तारांबळ उडाली असली तरी वारीचा उत्साह कमी नाही. दर्शनरांग पत्राशेडपर्यंत गेली होती. सकाळी पंढरपूरला आलेल्या मानाच्या पालख्या वाखरीत जेथे संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालख्या मुक्कामी होत्या तेथे दाखल झाल्या होत्या. येथे संतभेटीचा कार्यक्रम झाला. यानंतर सर्वच पालख्यांनी पंढरीकडे प्रस्थान ठेवले.
पंढरपूर शहरात 65 एकर भागात दीड लाखाहून अधिक भाविकांची राहण्याची व्यवस्था केली आहे. तेथे प्रशासनाने सुरक्षा, आरोग्य, पाणी, शौचालयं याची व्यवस्था चोख ठेवली आहे. दरम्यान शहरातील मठ , भक्तनिवास, लॉज तसेच गावभागात घरोघरी वारकरी उतरले आहेत. यासह मोकळी पटांगण ही वारकर्यांच्या राहुट्या व वाहनांनी भरून गेले आहेत. आषाढी यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून शहरात पोलिसांनी जवळपास पाच हजार पोलीस तैनात केले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकादशीची शासकीय महापूजा करणार आहेत. दरम्यान मंदिरे समितीच्यावतीने भाविकांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दर्शन रांगेत चहा, फराळाचे वितरण केले जात आहे. आज शनिवारी दशमी दिवशी पंढरीत भाविकांची गर्दी वाढल्यानंतर चंद्रभागा पात्रातही स्नानासाठी वारकरी मोठ्या संख्येने येत होते. वाळवंट व घाटांवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
□ उद्या रविवारी सायंकाळी दीपक कलढोणे यांची अभंगवाणी
#सोलापूर #sunday
सोलापूर – आषाढी एकादशी दिवशी उद्या रविवारी (दि.१० जुलै) सायंकाळी ५.३० वाजता गोविंदश्री मंगल कार्यालय जुळे सोलापूर येथे गायक दीपक कलढोणे यांचा अमृताची फळे हा कार्यक्रम सादर होणार आहे. निवेदन पत्रकार अरविंद जोशी यांचे राहणार आहे.
#solapur #अभंगवाणी #Abangan
अभंगवाणीसाठी संवादिनी व स्वरसाथ नीरज कलढोणे, वर्धराज मिर्जी, व्हायोलिन जयंत जोशी, तबला प्रसाद कुलकर्णी, मृदंग देवेंद्र अयाचित, तालवाद्ये अनंत जोशी व मल्लिकार्जुन कोरे, तानपुरा निरंजनी कलढोणे व गायत्री पोतदार तसेच सूत्रनिवेदन जगदीश पाटील आदींची साथसंगत लाभणार आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/577955983882135/